इतकी कामं न थकता करतं यकृत
डॉ. सुदीप खन्ना यांच्या मते, यकृत स्वतःला स्वच्छ ठेवण्यासोबत अन्य 500 पेक्षा जास्त कामं करतं. त्यामुळे जर यकृतावरच्या कोणत्याही एका कामाचा भार वाढला तर दुसऱ्या कामावर परीणाम होतो. जे अन्न आपण खातो त्या अन्नामध्ये पोषकतत्त्वं जरी असली तरीही ती पचवण्यासाठी यकृतालच पुन्हा मेहनत करावी लागते. त्यामुळे आपल्या गरज पडते ती यकृत शुद्ध करणाऱ्या म्हणजेच लिव्हर डिटॉक्सिफिकेशनला मदत करणाऱ्या पेयांची.
advertisement
जाणून घेऊयात कोणती पेय यकृतासाठी फायद्याची ठरतात.
हे सुद्धा वाचा : Morning Routine : दररोज करा ही 5 योगासनं, किडनी आणि लिव्हर राहतील उत्तम
आलं लिंबाचं पाणी:
लिंबात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते हे आपल्याला माहितीच आहे. डॉ. सुदीप खन्ना म्हणतात की, हे लिंबाचं पाणी यकृताला स्वच्छ आवश्यक ते एंझाइम्स तयार करतात. आल्यात असलेले दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे पचनासाठी फायद्याचे ठरतात. त्यामुळे पचनादरम्यान तयार होणारे विषारी घटक शरीराबाहेर टाकण्यात आलं लिंबाचं पाणी यकृतासाठी फायदेशीर ठरू शकतं.
बीटरूट ज्यूस :
यकृताचे कार्य सुधारण्यासाठी आणि पेशींचे पुनरुत्पादन करण्यासाठी बीटरूटचा ज्यूस फायद्याचा आहे. बीटरूटमध्ये बीटाइन अँटीऑक्सिडंट्स, नायट्रेट्स आणि फायबर असतात, ज्यामुळे पित्त काढून टाकयला किंवा कमी व्हायला मदत होते. ज्यांना फॅटी लिव्हरचा त्रास आहे अशा व्यक्तींनी बीटरूट ज्यूस पिणं हे यकृताच्या आरोग्याच्या फायद्याचं मानलं जातं.
हळदीचं पाणी:
आयुर्वेदातलं सोनं अशी हळदीची ओळख आहेत. हळदीतच्या दाहक विरोधी गुणधर्मांचा यकृताला फायदा होतो. याशिवाय हळदीतलं कर्क्यूमिन हे विषारी पित्तामुळे होणाऱ्या संभाव्य हानीपासून यकृताच्या पेशींचे संरक्षण करतं. त्यामुळे हळदीचं पाणी प्यायल्याने यकृताचं आरोग्य सुधारतं.
ग्रीन टी :
ग्रीन टी एक उत्कृष्ट अँटीऑक्सिडंट मानलं जातं. ग्रीन टीमध्ये असलेले कॅटेचिन यकृतावर जमलेली चरबी कमी करण्यास आणि रोगांपासून संरक्षण प्रदान करण्यास मदत करते. ग्रीन टीच्या नियमित वापरामुळे विषारी द्रव्यं जमा होण्याचं प्रमाण कमी होतं. पर्यायाने यकृतावरचा ताण कमी होऊन यकृताचं आरोग्य सुधारतं.