Weight Loss medicines for drug Addiction: काय सांगता? ‘या’ जादुई औषधाचा दुहेरी फायदा; वजनही होईल कमी आणि सुटेल दारूचं व्यसन

Last Updated:

Weight Loss medicines for drug Addiction: वजन कमी करण्यासाठी तयार केलेल्या औषधांचा फायदा दारूचं व्यसन कमी करण्यात झालाय. सध्या या औषधांवर आणखी संशोधन सुरूये. परवानगीनंतर वजन कमी करणारी औषधं व्यसनाधिनता कमी करण्यासाठी वापरली जाऊ शकतात.

प्रतिकात्मक फोटो : या'औषधांमुळे सुटेल दारूचं व्यसन
प्रतिकात्मक फोटो : या'औषधांमुळे सुटेल दारूचं व्यसन
मुंबई: दारू पिणं हे आरोग्यासाठी वाईटच. मात्र सध्याच्या हायफाय लाईफस्टाईलमुळे आता कॉलेजवयीन मुलांमध्ये दारू पिण्याचं प्रमाण वाढलंय. काहीजण टेन्शन दूर करण्साठी दारू पितात तर काही जण फक्त फॅशन म्हणून. मात्र दारू पिण्याचं वाढतं प्रमाण हे त्या व्यक्तीला नकळत व्यसनाधीनतेकडे घेऊन जातं. प्रमाणाबाहेर दारू प्यायल्यामुळे लिव्हरवर परिणाम होऊन लिव्हर निकामी होऊ शकतं. दारू पिण्यावरून झालेल्या भांडणांमुळे अनेक व्यक्तीचे संसार उद्ध्वस्त झाल्याची अनेक उदाहरणे आपण पाहतो. जर तुमच्या परिचयातली एखादी व्यक्ती दारूच्या आहारी गेली असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही दारूच्या व्यसनापासून दूर करण्यासाठी आता एक औषध उपलब्ध झालंय. त्यावर सध्या संशोधन सुरू असून मंजुरीनंतर लवकरच ते बाजारात येण्याची शक्यता आहे.

औषधाची निर्मिती केली होती ‘या’ कारणासाठी

स्थूलपणा (Obesity) किंवा वाढतं वजन ही आजच्या काळातली आणखी एक समस्या आहे. अनेक जण वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतात मात्र त्यांना यश येत नाही. त्यामुळे स्थूलपणा कमी करण्यासाठी संशोधकांनी एका औषधांची निर्मिती केली होती. ट्रायलच्या दरम्यान या औषधाचा फायदा वजन कमी होण्यावर झालाच मात्र या औषधाने दारू पिण्याच्या प्रमाणातही कमी झाल्याचं दिसून आलंय. या औषधामुळे पेप्टाइड 1 (GLP-1RAs) रिसेप्टर सक्रिय होतात.त्यामुळे दारू पिण्याची इच्छा कमी होते. याशिवाय या औषधाचा फायदा मूत्रपिंड आणि यकृताला देखील फायदा झाल्याचं सिद्ध झालंय.
advertisement

दारूचं सेवन 29 टक्क्यांनी घटलं

औषध तयार केल्यानंतर घेतल्या गेलेल्या ट्रायलमध्ये एकूण 88,190 लोकांनी भाग घेतला. या लोकांनी वजन कमी करण्यासाठी  एक्सेनाटाईड (Exenatide), डुलाग्लूटाईड (dulaglutide), लिराग्लूटाईड (liraglutide), सेमाग्लूटाईड (semaglutide), टिराझेपेटाईड (tirzepatide) ही इंजेक्शन घेतली. ही सर्व औषधं वजन कमी करण्यासाठी आहेत. चाचणीनंतर असं आढळून आलं की ही औषधं घेणाऱ्यांमध्ये ज्यांना दारू पिण्याचं व्यसन होतं त्याचं दारू पिण्याचं प्रमाण 29 टक्क्यांनी कमी झालं. इतकंच काय तर जी लोकं कधीतरी पण भरपूर दारू प्यायचे त्यांचीही दारू पिण्याची सवयही संपली.
advertisement

औषधामुळे मेंदूची अल्कोहोल-प्रेरित क्रिया कमी झाली

विविध औषधांच्या विविध परिणामांवर अभ्यास केला गेला. त्यात असं आढळून आले की, ज्यांनी सेमाग्लूटाईड(semaglutide)  आणि टिराझेपेटाईडची (tirzepatide) इंजेक्शन्स घेतले आणि ज्यांचा बीएमआय 30 पेक्षा कमी होता, त्यांना एकाच वेळी खूप जास्त दारू पिण्याची सवय होती. त्यांचं दारू पिण्याची सवय आणि एकाच वेली जास्त दारू पिण्याचं प्रमाम कमी झालं. तर दुसरीकडे ज्यांनी प्लेसीबो घेतला होता आणि ज्यांचा बीएमआय 25 पेक्षा कमी होता, मग त्याच्या दारू पिण्याच्या प्रमाणात वाढ झाली. अभ्यासात असंही आढळून आलं की ज्यांनी वजन कमी करण्याची औषधं घेतली त्यांना दारू पिण्याच्या सवयीमुळे त्यांच्या लिव्हर, किडनी अशा अवयवांना झालेलं नुकसानही भरून निघालं होतं. अभ्यासानुसार, वजन कमी करण्याच्या इंजेक्शनमुळे मेंदूतील व्यसनाधीन भागाची सक्रियता कमी होते आणि डोपामाइनचं प्रमाण वाढतं. यामुळे दारूची पिण्याची इच्छा कमी होते.
advertisement
तथापि, यावर अधिक संशोधन करणे सुरू आहे, त्यानंतरच वजन कमी होण्याच्या औषधांचा उपयोग दारूच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी केला जाऊ शकतो.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Weight Loss medicines for drug Addiction: काय सांगता? ‘या’ जादुई औषधाचा दुहेरी फायदा; वजनही होईल कमी आणि सुटेल दारूचं व्यसन
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement