मद्यपीने एक महिना दारू न प्यायल्यास त्याच्या शरीरात होतात असे बदल, वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
नियमित मद्यपानाची सवय असलेल्या व्यक्तीनं जर एक महिना दारू न पिल्यास त्याच्या शरीरावर नेमका काय परिणाम होतो? हे आज आपण जाणून घेणार आहोत.
मुंबई, प्रतिनिधी : आपल्या आजूबाजूला असणारे अनेकजण दारू पितात. काहीजण हौस म्हणून दारू पितात तर काहीजणांना दारूची सवय (व्यसन) लागलेली असते. दारू म्हणजेच अल्कोहोल हे आरोग्यासाठी चांगलं नाही. तरीही जगभरातील लाखो लोकांच्या जीवनशैलीमध्ये दारूचा समावेश होतो. दारूची सवय असलेल्या व्यक्तीला एक महिना दारू मिळाली नाही तर तिच्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतात, हे जाणून घेणं रंजक आहे. 2010मध्ये लाइफ एज्युकेशन नावाच्या एका ऑस्ट्रेलियन युवा आरोग्य संस्थेने 'सोबर ऑक्टोबर'ची कल्पना राबवून निधी उभारला होता. तेव्हापासून दरवर्षी सोबर ऑक्टोबरमधून निधी जमा केला जातो आणि तो यूके-बेस्ड मॅकमिलन कॅन्सर सपोर्ट या धर्मादाय संस्थेला दिला जातो.
एक महिना दारू न प्यायल्याने एकूण आरोग्यावर खरोखरच काही फरक पडतो का? याबाबत या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे. कॅन्सर, हार्ट फेल्युअर, डायबेटिस आणि इतर क्रॉनिक आजारांशी अतिमद्यपानाचा अतिशय जवळचा संबंध असल्याचं अनेक संशोधनांमधून सिद्ध झालेलं आहे. चेशायरमधील डेलामेरे रिहॅब क्लिनिकमधील डॉ. कॅथरीन कार्नी (Catherine Carney) म्हणाल्या, "नियमित आणि जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. ब्रिटनमधील 56 टक्के लोक म्हणतात की, ते विश्रांतीसाठी अल्कोहोलचं सेवन करतात. यामुळे तात्पुरता आराम तर मिळतो पण, एकंदरीत मानसिक आरोग्य बिघडू शकतं. अल्कोहोलचा झोपेच्या गुणवत्तेवर देखील परिणाम होतो. एक महिना अल्कोहोल सोडल्यास ब्लड प्रेशरची समस्या, हार्ट फेल्युअर, स्ट्रोकसारख्या समस्या टाळता येऊ शकतात."
advertisement
युकेतील प्रसिद्ध डॉक्टर रॉस पेरी यांनी एक महिना दारू न पिण्याचे फायदे सांगितलं आहेत. रॉस म्हणाले, "शेवटचा पेग घेतल्यानंतर लिव्हर ओव्हरटाइम करण्यास सुरवात करतं. स्वादुपिंड अतिरिक्त इन्सुलिन तयार करण्यास सुरवात करतं. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीला खूप पाणी पिणं गरजेचं आहे. पाणी प्यायल्यास शरीर लिव्हर आणि किडनीच्या माध्यमातून विषारी पदार्थ बाहेर टाकतं. दारू बंद केल्यानंतर मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सामान्य व्हायला 72 तास लागतात."
advertisement
डॉ. रॉस यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन आठवड्यांनंतर वजन कमी होणे, डोळ्यांखालची सूज कमी होणे, पोटाचा घेर कमी होणे यांसारखे बदल दिसतील. त्वचा अधिक स्वच्छ दिसू लागेल. तीन आठवड्यांनंतर हाय ब्लड प्रेशरची समस्या कमी होऊ शकतो. एका महिन्यात, त्वचा आणि डोळे अधिक चांगले दिसतील. लिव्हरमधील फॅट्स 15 टक्क्यांपर्यंत कमी होईल. एक महिना दारू न घेतल्यास दारूचं व्यसन पूर्णपणे सुटेलचं असं नाही. पण, बहुतांशी लोकांना असं करून दारूचं प्रमाण कमी करण्याची प्रेरणा नक्कीच मिळेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 05, 2024 2:04 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
मद्यपीने एक महिना दारू न प्यायल्यास त्याच्या शरीरात होतात असे बदल, वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य