साहित्य : 2 कप मक्याचे दाणे, 1 कांदा, चिरलेली कोथिंबीर, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1/2 इंच आल्याचा तुकडा, 3 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा चाट मसाला, चिमूटभर हिंग, मीठ, 2 चमचे तांदूळ पीठ, 1 ते 2 कप बेसन
advertisement
कृती : सर्वप्रथम एका बाउलमध्ये मक्याचे दाणे काढून घ्या. त्यातील 2 ते 3 चमचे मक्याचे दाणे बाजूला काढून मिक्सरमध्ये वाटून घ्या. मग वाटलेला मका आणि बाऊलमध्ये काढलेले मक्याचे दाणे मिक्स करा. मग त्यात हळद, मीठ, चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिरच्यांचे तुकडे, ठेचलेलं आलं, लसणाच्या पाकळ्या, चाट मसाला, तांदूळ पीठ, बेसन पीठ आणि चिमूटभर हिंग इत्यादी साहित्य टाकून मिक्स करून घ्या. हे मिश्रण पाणी न घालता व्यवस्थित एकजीव करून घ्या. मग कढईत तेल गरम करून त्यात कॉर्न भजी टाका. अशा प्रकारे कुरकुरीत कॉर्न भजी तयार होते.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 02, 2024 8:23 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Corn Pakoda : पावसाळ्यात बनवा लोणावळा स्टाईल कुरकुरीत कॉर्न भजी, खाल तर बोट चाटत बसाल