Cooking Tips : कांदा भजी फार तेलकट होते? वापरा 4 सोप्या टिप्स, भजी जास्त तेल शोषणार नाही
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
How To Make Crispy Kanda Bhaji : पावसाळ्यात कांदा भजी खाण बहुतेकांना आवडतं. बाहेर थंडगार पाऊसधारा आणि हातात गरमागरम कुरकुरीत कांदाभजीची प्लेट म्हणजे स्वर्ग सुखचं वाटू लागतं. मात्र अनेकदा भजी तळताना त्यात खूप जास्त तेल शोषल गेल्याने भजी फार तेलकट होतात. जास्त तेलकट भजी खाल्ल्याने घशाला खवखव होते आणि यामुळे त्याची चव सुद्धा बदलते. तेव्हा भजी करताना तेल जास्त शोषल जाणार नाही यासाठी काही सोप्या टिप्स वापरू शकता.
advertisement
advertisement
advertisement
भजी करण्यासाठी जे बेसनाचे बॅटर वापरले जाते ते तयार करताना योग्य प्रकारे साहित्यांचा वापर करणे महत्वाचे आहे. भजीसाठी बॅटर तयार करताना एका बाऊलमध्ये बेसनाचं पीठ घेऊन मसाले घालून मिक्स करावे. बेसनाचे बॅटर जास्त पातळ किंवा जाडसर असू नये याची काळजी घ्या. मग तेल गरम झालं की त्यात एक भजी टाकून त्याला बेसन चांगलं कोट होतंय की नाही हे पहा. जर बेसन भजीवर व्यवस्थित कोट होत नसेल तर बॅटरमध्ये दोन ते तीन थेंब तेल मिक्स करावे. यामुळे भजीला जास्त तेल शोषणार नाही.
advertisement