TRENDING:

मासे खायला प्रचंड आवडतात? हे 6 मासे चुकूनही खाऊ नका, ठरु शकतात हानिकारक

Last Updated:

मासे चवीला तर चांगले असतातच शिवाय आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर असतात. त्यांचा स्रोत, त्यांच्यातील फॅट्सचं आणि फायबरच्या प्रमाणावरून माशांचं विविध श्रेणींमध्ये वर्गीकरण केलं जाऊ शकतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी मुंबई: समुद्रात नानाविध प्रकारचे अतिशय सुंदर मासे आहेत. प्रत्येक माशाचं वेगळं वैशिष्ट्य आहे. अनेक माशांचा माणसाच्या आहारामध्ये देखील समावेश केला जातो. मासे चवीला तर चांगले असतातच शिवाय आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर असतात. त्यांचा स्रोत, त्यांच्यातील फॅट्सचं आणि फायबरच्या प्रमाणावरून माशांचं विविध श्रेणींमध्ये वर्गीकरण केलं जाऊ शकतं. रोहू, कटला आणि पुंटियस हे गोड्या पाण्यातील मासे आहेत तर पॉम्फ्रेट (पापलेट), बॉम्बे डक, भेतकी आणि हिल्सा हे खाऱ्या पाण्यात आढळणारे मासे आहेत. कॅटफिश, ताकी आणि कोळंबी यांसारख्या माशांमध्ये फॅट्सचं प्रमाण कमी असतं तर पांगा, चितळ, भेतकी आणि हिल्सामध्ये फॅट्स प्रमाण जास्त असतं. मासे आरोग्यासाठी कितीही चांगले असले तरी काही मासे आहारात असू नयेत.
हे 6 मासे चुकूनही खाऊ नका, ठरु शकतात हानिकारक
हे 6 मासे चुकूनही खाऊ नका, ठरु शकतात हानिकारक
advertisement

1) कॅटफिश: या माशांना सहसा हॉर्मोन्सची इंजेक्शन दिली जातात. त्यामुळे खाण्यासाठी अयोग्य ठरू शकतात. मार्केटमधून मोठ्या आकारचे कॅटफिश खरेदी न करण्याचा सल्ला दिला जातो. त्याऐवजी लहान मासे निवडले पाहिजेत. कारण, ते तुलनेने अधिक सुरक्षित असतात.

Parenting Mistakes : पालकांनी करू नयेत या 10 चूका, नाहीतर मुलांचा आत्मविश्वास होतो कमी

advertisement

2) मॅकरेल: या माशामध्ये व्हिटॅमिन 'ए' आणि 'डी' भरपूर प्रमाणात असतात. मात्र, या माशांमध्ये पाऱ्याचं प्रमाण देखील असतं. हा पारा आपल्या शरीरात जमा होऊ शकतो. जर नियमितपणे पारा पोटात गेला तर आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

3) तिलापिया: या माशाला फार मागणी आहे. त्यामुळे त्याची मोठ्या प्रमाणावर मत्स्यशेती केली जाते. अनेक ठिकाणी माशांना खाद्य म्हणून कमर्शिअल फीड किंवा वाया गेलेलं चिकन दिलं जातं. तिलापियाचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने हार्ट ॲटॅक, स्ट्रोक आणि अस्थमा होण्याचा धोका वाढू शकतो. तिलापियामध्ये प्रोटिन कमी असते आणि डिब्युटिल्टन हे केमिकल जास्त असतं. काही जणांना यामुळे अस्थमा आणि ॲलर्जी होऊ शकते.

advertisement

4) टूना: या माशामध्ये बी-3, बी-12, बी-6, बी-1, बी-2 आणि डी हे व्हिटॅमिन्स मुबलक प्रमाणात असतात. मॅकरेल माशांप्रमाणेच टूनामध्ये देखील पारा आढळतो. याशिवाय, या माशांवर कधीकधी हॉर्मोन्स आणि प्रतिजैविकांचा वापर केला जातो. हे घटक आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात.

5) सार्डिन: टूना आणि मॅकरेलप्रमाणे सार्डिन माशामध्ये देखील पारा आढळतो. परिमाणी, हा मासा देखील आरोग्यासाठी घातक ठरू शकतो.

advertisement

6) बासा: अनेकदा फिश करी किंवा फिश फिंगर्ससारख्या पदार्थांमध्ये भेतकीचा पर्याय म्हणून बासा मासा वापरला जातो. या माशामध्ये हानिकारक फॅटी ॲसिड असतात. ही ॲसिड्स कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवू शकतात. श्वसनाचा त्रास किंवा संधिवात असलेल्यांनी हा मासा खाऊ नये.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: डाळिंबानं मार्केट खाल्लं, रविवारी शेवगा आणि गुळाला किती मिळाला दर?
सर्व पहा

बऱ्याच देशांमध्ये कच्चा मासा वापरला जातो. पण, आपल्या देशातील हवामान बघता कच्चा मासा खाणं योग्य नाही. त्यामुळे पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. काही कच्च्या माशांमध्ये हानिकारक जीवाणू असू शकतात. माशांमध्ये प्रोटिन जास्त असते. त्यामुळे ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. पण, संयम महत्त्वाचा आहे. कारण, विशिष्ट प्रकारच्या पदार्थांच्या अतिसेवनामुळे पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
मासे खायला प्रचंड आवडतात? हे 6 मासे चुकूनही खाऊ नका, ठरु शकतात हानिकारक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल