माधुरीने सांगितलेली कांदा भजी बनवण्याची रेसिपी :
सर्वप्रथम तीन ते चार कांदे गोलाकार कापून घ्यावेत. त्यात अर्धी वाटी बेसन पीठ घालावे. मग पाव वाटी तांदळाचे पीठ घालून एकत्र मिक्स करावे. मग त्यात चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद घालावी. पाव चमचा लसणाची पेस्ट, बारीक चिरलेल्या मिरच्या असं करून मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यावे. त्यात एक चमचा तेल घालावे. कांदा भजीच्या मिश्रणात अजिबात पाणी घालू नये, कारण यामुळे भजीचं टेक्शचर बिघडू शकतं.
advertisement
दुसऱ्या बाजूला कढईत तेल गरम करून घ्या. तेल गरम झालं की हळूहळू भजी त्यात सोडा आणि तळून घ्या. अशाप्रकारे खमंग भजी तयार होतात. तसेच जर तुम्ही डायट करत असाल किंवा तळणीचे पदार्थ खायला आवडत नसतील तर तुम्ही एअर फ्रायरमध्ये सुद्धा कांदा भजी बनवू शकता. एअर फ्रायर योग्य टेम्परेचरवर सेट करून त्यात एका बटर पेपरवर कांदा भजीचे गोळे ठेवा. तेलाशिवाय यात छान कांदा भजी तयार होतात. तुम्ही जर डायट कॉन्शियस असाल तर हा पर्याय वापरू शकता.
Tea Chapati : रोज चहा चपाती खातायं? आरोग्यावर असा होतो परिणाम, डॉक्टर काय म्हणाले?
कांदा भजी बनवताना 'या' चुका टाळा :
कांदा भजीला कुरकुरीतपणा येण्यासाठी त्यात कॉनफ्लॉवर किंवा तांदळाचे पीठ वापरू शकता. तेल खूप गरम झाल्याशिवाय त्यात गरम भजी सोडू नये अन्यथा भजी जास्त तेल शोषून घेते. चव येण्यासाठी भजीच्या पिठात धणे किंवा ओवा घालू शकता. कांदा भजी कुरकुरीत व्हावी असं वाटतं असेल तर त्यात बिलकुल पाणी टाकू नका. कांद्यात मीठ टाकल्याने आपोआप त्याला पाणी सुटते. हा ओलसरपणा पीठ कालवण्यासाठी पुरेसा असतो.