Tea Chapati : रोज चहा चपाती खातायं? आरोग्यावर असा होतो परिणाम, डॉक्टर काय म्हणाले?

Last Updated:

आयुर्वेदानुसार चहा आणि चपाती हे कॉम्बिनेशन तब्येतीसाठी नुकसानदायक ठरू शकतं. तेव्हा चहा चपाती खात असताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे जाणून घेऊयात.

रोज चहा चपाती खातायं? आरोग्यावर असा होतो परिणाम, डॉक्टर काय म्हणाले?
रोज चहा चपाती खातायं? आरोग्यावर असा होतो परिणाम, डॉक्टर काय म्हणाले?
सकाळच्या वेळी अनेकजण नाश्त्याला चहा आणि चपाती खातात. यामुळे आपण काहीतरी पौष्टिक खात असल्याच अनेकांना वाटतं. पण तुम्हाला माहितीये का चहा चपाती हे विरुद्ध कॉम्बिनेशन असून त्याचा गंभीर परिणाम हा आरोग्यावर होऊ शकतो. आयुर्वेदानुसार चहा आणि चपाती हे कॉम्बिनेशन तब्येतीसाठी नुकसानदायक ठरू शकतं. तेव्हा चहा चपाती खात असताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे जाणून घेऊयात.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत यात डॉक्टरांनी चहा चपाती खाण्याविषयी सांगितलं आहे. डॉक्टरांनी सांगितले की चहा आणि चपाती एकत्र खाल्ल्याने लाळेतील संयोगाने शरीरातील कफ वाढून कफचे विकार निर्माण होऊ शकतात. गहू आणि दूध एकत्र खाल्ल्याने पोटात जळजळ होणे, केस पांढरे होणे, सर्दी होणे, शरीर गरम होणे, त्वचेला खाज येणे, मानेवर काळे चट्ट्टे उठणे इत्यादी गोष्टी होऊ शकतात.
advertisement
अनेकजण चहा चपाती खात असताना चहात जास्त साखर टाकतात. ज्यात हाय कॅलरीज असतात. अशात तुम्ही चहा आणि चपाती एकत्र खाल्ल्याने वजन वाढण्याचा धोका असतो. तसेच यामुळे निद्रानाश सुद्धा उद्भवू शकतो. दररोज चहा चपाती खाल्ल्याने हृदयाच्या गतीवर परिणाम होऊ शकतो. तसेच पचनासंबंधित समस्या सुद्धा निर्माण होऊ शकतात.
advertisement
advertisement
आहारतज्ज्ञ सुनिता राय चौधरी सांगतात की, चहा सोबत चपाती खाण नुकसानदायक ठरू शकतं. ज्यामुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळत असली तरी पोषकतत्व मिळत नाहीत. चहा चपाती या नाश्त्याने कॅल्शियम, कार्बोहायड्रेट आयरन इत्यादी योग्य प्रमाण मिळत नाही.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Tea Chapati : रोज चहा चपाती खातायं? आरोग्यावर असा होतो परिणाम, डॉक्टर काय म्हणाले?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement