Personality Test: फोन पकडण्याच्या स्टाईलवरून कळते Personality! कसं ते माहितीये का?

Last Updated:

तुम्ही हातात फोन कशा प्रकारे पकडता यावरून तुमची पर्सनॅलिटी, तुमचा स्वभाव, छंद आणि तुमच्यातील निगेटिव्ह बाजू समोरच्याला तुम्ही न सांगता सुद्धा कळू शकतात.

फोन पकडण्याच्या स्टाईलवरून कळते Personality! कसं ते माहितीये का?
फोन पकडण्याच्या स्टाईलवरून कळते Personality! कसं ते माहितीये का?
फोन ही आताच्या युगात एक महत्वाची गोष्ट बनली आहे. सध्या प्रत्येक व्यक्तीच्या हातात फोन पाहायला मिळतो. पण तुम्हाला माहितीये का? तुम्ही हातात फोन कशा प्रकारे पकडता यावरून तुमची पर्सनॅलिटी, तुमचा स्वभाव, छंद आणि तुमच्यातील निगेटिव्ह बाजू समोरच्याला तुम्ही न सांगता सुद्धा कळू शकतात. एका अभ्यासानुसार फोन वेगवेगळ्या प्रकारे पकडणे यावरून व्यक्तीच व्यक्तिमत्व कसं आहे हे लक्षात येऊ शकतं.
एका हाताने फोन पकडणे आणि त्याच हाताच्या अंगठ्याने त्याचा वापर करणे :
जर तुम्ही तुमचा फोन एका हाताने पकडता आणि त्याच हाताच्या अंगठ्याने तो स्क्रोल करत असाल तर यावरून तुम्ही बेफिकर आणि आत्मविश्वासू व्यक्ती आहात हे समजते. तुम्ही जीवनातील आव्हाने सहज स्वीकारता आणि नवीन संधी मिळवण्यासाठी नेहमी तयार असता. तथापि, आपण कधीकधी घाईघाईने निर्णय घेऊ शकता.
advertisement
दोन्ही हातांनी फोन पकडून एका अंगठ्याने स्क्रोल करणे :
जर तुम्ही तुमचा फोन दोन्ही हाताने पकडून एक अंगठा वापरून स्क्रोल करत असाल तर तुम्ही सावधानतेने आणि सहानुभूतीपूर्वक जीवन जगणारे व्यक्ती आहात. तुम्ही दुसऱ्यांच्या भावना जाणता तसेच धोके टाळण्याचा प्रयत्न करता. तुम्ही तुमचे निर्णय विचारपूर्वक घेता आणि इतरांसाठी आधार होता.
दोन्ही हातांनी फोन पकडून दोन्ही अंगठ्यानी स्क्रोल करणे :
जर तुम्ही तुमचा फोन दोन्ही हातांनी पकडून दोन्ही अंगठ्यांनी स्क्रीन स्क्रोल करत असाल तर तुम्ही खूप ऊर्जावान व्यक्ती आहात. तुम्ही खूप वेगाने विचार करता आणि समोर येणाऱ्या आव्हानांचा सामना करता. तुम्ही खूप सोशल असण्यासोबत लोकांमध्ये लोकप्रिय असाल. तुम्ही कधीकधी खूप जास्त काम करण्याचा प्रयत्न करू शकता.
advertisement
एका हाताने फोन पकडून अंगठ्याच्या बाजूच्या बोटाने स्क्रीन स्क्रोल करणे :
जर तुम्ही एका हाताने फोन पकडून दुसऱ्या हाताच्या अंगठ्या जवळील बोटाने स्क्रोल करत असाल तर तुम्ही बुद्धिमान आणि नीट विचार करून निर्णय घेणारे व्यक्ती असू शकता. तुम्ही दुसऱ्यांच्या बोलण्याने लगेच प्रभावित होणारे व्यक्ती नाहीत. तुम्ही तुमच्या विचारांवर अडून राहता. तुम्ही एक चांगले नेता आणि प्रभावशाली व्यक्ती आहात.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Personality Test: फोन पकडण्याच्या स्टाईलवरून कळते Personality! कसं ते माहितीये का?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement