खेकडा रस्सा करण्यासाठी साहित्य :
7 खेकडे
2 कांदे
1 वाटी सुके खोबरे
4-5 लवंग काळीमिरी
4-5 लसूण पाकळ्या
1 टीस्पून खसखस
1 टोमॅटो
1 इंच आल्याचा तुकडा
3 चमचे तेल
मीठ चवीनुसार
2 चमचे धने पावडर
1-2 चमचा हळद
खेकडा रस्सा रेसिपीची कृती :
सर्व प्रथम खेकडे नीट स्वच्छ करून घ्या. युट्यूबवर खेकडे साफ कसे करायचे याबाबत अनेक व्हिडीओ उपलब्ध आहेत. खेकड्याच्या रस्सा बनवण्यासाठी तुम्ही त्याचे वाटण तयार करा. वाटणाकरीता कांदा खोबरं छान खरपूस भाजून घ्या त्या सोबत खसखस, लवंग, दालचिनी, काळीमिरी, लसूण भाजुन, घ्यावे. अशा प्रकारे वाटण तयार होईल. खेडकड्याचे छोटे नांगे मिस्करमधून वाटून घ्यावेत.
advertisement
रस्सा तयार करण्यासाठी गॅसवर कढई ठेवा आणि त्यात तेल तापवून घ्या. तेल तापलं की त्यात वाटण टाकून चांगले परतवून घ्या. मग त्यात लाल मसाला, हळद, धणे पावडर चांगलं परतवून घ्या. वाटण नीट परतवून घ्या आणि मग त्यात तुम्हाला केवढा रस्सा हवा तेवढे पाणी ओता. उकळी आल्यावर त्यात स्वच्छ केलेली खेकडी टाका. चवीनुसार मीठ टाका अशा प्रकारे खेकडा रस्सा तयार होतो.