Onion Pakoda : माधुरी दीक्षितच्या घरी अशी बनवली जाते कांदा भजी; स्वतः शेअर केला Video, एकदा ट्राय कराच

Last Updated:

घरी परफेक्ट कांदा भजी कशी बनवायची याविषयी अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने व्हिडीओ शेअर करत सांगितले आहे. माधुरीने तिच्या घरात कांदा भजी कशी बनवली जाते याविषयी सांगितले आहे.

माधुरी दीक्षितच्या घरी अशी बनवली जाते कांदा भजी; स्वतः शेअर केला Video, एकदा ट्राय कराच
माधुरी दीक्षितच्या घरी अशी बनवली जाते कांदा भजी; स्वतः शेअर केला Video, एकदा ट्राय कराच
पावसात कांदा भजीचा आस्वाद घेणे म्हणजे स्वर्गसुख. बाहेर धो धो कोसळणारा पाऊस आणि खिडकीत बसून गरमागरम कांदा भजी खाण कोणाला आवडत नाही. त्यामुळे पावसाळ्यात बऱ्याच घरांमध्ये संध्याकाळच्या वेळी कांदा भजीचा बेत असतो. परंतू काहींची कांदा भजी ही खूप तेलकट होते, तर काहींची भजी ही बेचव होते. तेव्हा घरी परफेक्ट कांदा भजी कशी बनवायची याविषयी अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने व्हिडीओ शेअर करत सांगितले आहे. माधुरीने तिच्या घरात कांदा भजी कशी बनवली जाते याविषयी सांगितले आहे.
माधुरीने सांगितलेली कांदा भजी बनवण्याची रेसिपी :
सर्वप्रथम तीन ते चार कांदे गोलाकार कापून घ्यावेत. त्यात अर्धी वाटी बेसन पीठ घालावे. मग पाव वाटी तांदळाचे पीठ घालून एकत्र मिक्स करावे. मग त्यात चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद घालावी. पाव चमचा लसणाची पेस्ट, बारीक चिरलेल्या मिरच्या असं करून मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यावे. त्यात एक चमचा तेल घालावे. कांदा भजीच्या मिश्रणात अजिबात पाणी घालू नये, कारण यामुळे भजीचं टेक्शचर बिघडू शकतं.
advertisement
advertisement
दुसऱ्या बाजूला कढईत तेल गरम करून घ्या. तेल गरम झालं की हळूहळू भजी त्यात सोडा आणि तळून घ्या. अशाप्रकारे खमंग भजी तयार होतात. तसेच जर तुम्ही डायट करत असाल किंवा तळणीचे पदार्थ खायला आवडत नसतील तर तुम्ही एअर फ्रायरमध्ये सुद्धा कांदा भजी बनवू शकता. एअर फ्रायर योग्य टेम्परेचरवर सेट करून त्यात एका बटर पेपरवर कांदा भजीचे गोळे ठेवा. तेलाशिवाय यात छान कांदा भजी तयार होतात. तुम्ही जर डायट कॉन्शियस असाल तर हा पर्याय वापरू शकता.
advertisement
कांदा भजी बनवताना 'या' चुका टाळा :
कांदा भजीला कुरकुरीतपणा येण्यासाठी त्यात कॉनफ्लॉवर किंवा तांदळाचे पीठ वापरू शकता. तेल खूप गरम झाल्याशिवाय त्यात गरम भजी सोडू नये अन्यथा भजी जास्त तेल शोषून घेते. चव येण्यासाठी भजीच्या पिठात धणे किंवा ओवा घालू शकता. कांदा भजी कुरकुरीत व्हावी असं वाटतं असेल तर त्यात बिलकुल पाणी टाकू नका. कांद्यात मीठ टाकल्याने आपोआप त्याला पाणी सुटते. हा ओलसरपणा पीठ कालवण्यासाठी पुरेसा असतो.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Onion Pakoda : माधुरी दीक्षितच्या घरी अशी बनवली जाते कांदा भजी; स्वतः शेअर केला Video, एकदा ट्राय कराच
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement