अंबानगरी चौक ते अंबादेवी मंदिरापर्यंत अनेक वाण सामानाची दुकाने आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला डेलीच्या वापरात येणाऱ्या अनेक वस्तू मिळतील. अंबादेवी मंदिराजवळ कंगवा, कानातले, वेगवेगळ्या प्रकारच्या रिबन, नेलपेंट, क्लिप आणि इतर बऱ्याच वस्तू तुम्हाला अगदी 10 रुपयांपासून ते 50 रुपयांपर्यंत मिळतात. या वस्तू तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. त्याचबरोबर छोटे रुमाल सुद्धा 15 ते 30 रुपयांपर्यंत या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. ते सुद्धा तुम्ही वाण म्हणून देऊ शकता.
advertisement
10 रुपयांपासून प्लास्टिकच्या वस्तू
मंदिराच्या थोडे समोरं गेलं की, प्लास्टिकच्या अनेक गृहउपयोगी वस्तू तुम्हाला दिसतील. त्यामध्ये डस्टबिन, छोटे टोपले, बास्केट आणि इतर अनेक वस्तू 30 रुपयांपासून मिळतात. अंबादेवी मंदिरापासून थोडं आणखी पुढे गेल्यानंतर छोट्या पर्स, टिकली पॉकेट, आरसे, वेणी या सर्व वस्तू सुद्धा 10 रुपयांपासून अंबादेवी मार्केटमध्ये तुम्हाला मिळतील. मंगळसूत्र आणि इतर दागिने 50 रुपयांपासून या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.
त्यानंतर वाण सामान म्हणून देण्यासाठी प्लास्टिकच्या वस्तू, त्यामध्ये चहा गाळणी, घासणी, बादली, ब्रश, छोटे मोठे प्लास्टिक डबे, हे सर्व 10 रुपयांपासून उपलब्ध आहेत. अतिशय आकर्षक आणि ट्रेंडिंग अशा वस्तू तुम्ही अगदी कमीत कमी किमतीमध्ये अंबादेवी मार्केट येथून खरेदी करू शकता. डझनभर किंवा जास्तीत जास्त वस्तू खरेदी केल्यास तुम्हाला काही सूट सुद्धा याठिकाणी दिल्या जाते.