मुंबई - दिवाळीसाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. बाजारात नवीन कंदील आले आहेत. अनेक लोकांनी तर कंदील कोणता घ्यायचा, हेसुद्धा ठरवले असेल. पण पूर्वीच्या काळात घर सजवण्यासाठीच्या वस्तू घरीच बनवल्या जायच्या. त्यामुळे त्या जास्त काळ टिकून राहायच्या. तुम्ही बाजारातून वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट्स वापरून बनवलेले, प्लास्टिकचे आकाश कंदील घेण्याचा विचार करत असाल तर असे आकाश कंदील घेण्यापेक्षा तुम्ही घरीच कंदील बनवू शकता.
advertisement
कंदील बनवणारे विनायक कांबळी यांच्याशी लोकल18 च्य टीमने संवाद साधला. विनायक कांबळी यांची तब्बल कंदील बनवणारी ही तिसरी पिढी आहे. त्यांच्या तीन पिढ्यापासून कंदील बनवण्याचा व्यवसाय आहे. ते स्वतः हँडमेट कंदील बनवतात. एखाद्या बॉक्सासारखा दिसणारा आणि दिवाळीनंतरही घरी शोपीस म्हणून वापरता येणारा हा आकाश कंदील कसा बनवायचा हेच लोकल18 च्या टीमने त्यांच्याकडून जाणून घेतले.
बँकेतली नोकरी सोडली अन् 26 व्या वर्षी बनली महाराष्ट्रातील पहिली महिला ST चालक, कोण आहे ही तरुणी?
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, आकाश कंदील बनवण्यासाठी वॉटरप्रूफ पेपरचा वापर केला जातो. त्याला बनवण्यासाठी काड्या, पेपर, लेस, गम इत्यादी साहित्याची गरज लागते आणि यासोबत आकाश कंदील बनवण्यासाठी 45 मिनिटे लागतात. आता सध्या लोकांच्या मागणीनुसार एखाद्या बॉक्सानुसार दिसणारा आणि घरी शोपीस साठी वापरण्यात येणारा कंदिलाच्या मागणीनुसार कांबळी कंदील बनवून देतात.
या बॉक्स कंदीलसाठी 2 बॉक्स फ्रेम बनवून घ्याव्या लागतात आणि या दोन्ही बॉक्सला कोपऱ्यात दोन खड्डे पाडून घ्यावे लागतात. यामध्ये या कागदाचे दोन पिलर जॉईन करावे लागतात. तर मग अशाप्रकारे तुम्ही घरच्या घरी आकाशकंदील बनवू शकतात, असे त्यांनी सांगितले.