ऐकायला हे अशक्य वाटतंय ना? पण जगाच्या पाठीवर एक असा माणूस आहे, ज्याने आपल्या सर्व पत्नींसोबत एकाच वेळी शांतपणे झोपता यावं, यासाठी चक्क 80 लाख रुपये खर्च करून जगातील सर्वात अनोखा आणि अवाढव्य बेड तयार केला आहे.
ब्राझीलच्या साओ पाउलोमध्ये राहणारा आर्थर ओ उर्सो हा सोशल मीडिया इन्फ्लूएंसर सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. आर्थर हा त्याच्या फिटनेसमुळे नाही, तर त्याच्या Polygamy (एकापेक्षा जास्त जोडीदार असणे) जीवनशैलीमुळे ओळखला जातो. एकेकाळी त्याला 9 पत्नी होत्या, मात्र सध्या तो 6 पत्नींसोबत एकाच छताखाली सुखाचा संसार करत आहे.
advertisement
15 महिन्यांची मेहनत आणि 950 स्क्रूचा खेळ
आर्थरच्या आयुष्यात सर्वात मोठी अडचण होती ती म्हणजे झोपण्याची जागा. पत्नींमध्ये जागेवरून वाद होऊ नयेत आणि सर्वांना सोबत वेळ घालवता यावा, यासाठी त्याने एक 'सुपर बेड' बनवण्याचा निर्णय घेतला.
हा पलंग तयार करण्यासाठी तब्बल 12 कारागिरांनी 15 महिने रात्रंदिवस काम केलं.
इतक्या लोकांचा भार पेलण्यासाठी या बेडमध्ये चक्क 950 स्क्रू (पेंच) लावून त्याला मजबुती देण्यात आली आहे. हा बेड सुमारे 20 फूट लांब आणि 7 फूट रुंद आहे. हा आकार पाहून भल्याभल्यांच्या बेडरुम कमी पडेल, इतका हा पलंग भव्य आहे.
सोर्स : सोशल मीडिया
80 लाखांची गुंतवणूक कशासाठी?
एका बेडवर 80 लाख रुपये खर्च करणं अनेकांना मूर्खपणाचं वाटू शकतं. पण आर्थरच्या मते, ही त्याच्या नात्यातील गुंतवणूक आहे. आर्थर म्हणतो, "आधी आमच्यामध्ये जागेवरून अनेकदा खटके उडायचे. कुणाला तरी वेगळं झोपावं लागायचं, ज्यामुळे त्या बायकोला कमीपणा वाटायचा. आता या महाकाय बेडमुळे आम्ही सगळे एकत्र झोपू शकतो, ज्यामुळे आमच्यातील बाँडिंग अधिक घट्ट झालं आहे."
आर्थरचं विचित्र कुटुंब
आर्थरच्या नऊ पत्नींपैकी चौघींनी त्याला घटस्फोट दिला आहे, पण त्यानंतर त्याने 51 वर्षीय ओलिंडा मारियाशी लग्न केलं. सध्या त्याच्या कुटुंबात लुआना काजाकी, एमेली सूजा, वाल्किरिया सैंटोस, ओलिंडा मारिया, डामियाना आणि अमांडा अल्बुकर्क या सहा पत्नी आहेत. या सर्वांना सोबत घेऊन तो एकाच घरात राहतो.
आर्थरची ही जीवनशैली सोशल मीडियावर टीकेचा विषय ठरत असली, तरी तो मात्र आपल्या 'मोठ्या' कुटुंबासह आणि या 'भव्य' बेडसह आनंदी असल्याचा दावा करतो. प्रेमासाठी लोक काय करतील याचा नेम नाही, पण 80 लाखांचा हा बेड मात्र सध्या जगभर चर्चेचा विषय ठरला आहे.
