'जर्नल ऑफ क्लिनिकल एंडोक्रायनॉलॉजी अँड मेटाबॉलिझम'मध्ये दिलेल्या माहितीनुसार, पेरिमेनोपॉझच्या काळात शरीरातल्या प्रोजेस्टेरॉन आणि एस्ट्राडिओलमध्ये (इस्ट्रोजेनचा सर्वांत प्रभावी प्रकार) बदल होतात. त्यामुळे नैराश्याची लक्षणं वाढतात. पेरिमेनोपॉझमध्ये इस्ट्रोजेनची पातळी कमी झाल्यामुळे बायपोलर डिसऑर्डर आणि स्किझोफ्रेनियासारख्या समस्या विकसित होऊ लागतात. त्यामुळे चिडचिड, नैराश्य, तणाव आणि झोप न लागणं अशी लक्षणं दिसतात.
पुरुषांच्या तुलनेत महिला आहेत दीर्घायुषी, पण कोणत्या किंमतीवर? समोर आली धक्कादायक माहिती
advertisement
मेनोपॉझमध्ये मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी काय करावं?
1) हार्मोन्स मधल्या बदलांमुळे शरीरात अशक्तपणा, थकवा आणि तणाव वाढू लागतो. अशा स्थितीत मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचं सेवन केल्याने अँक्झायटीची आणि झोप न येण्याची समस्या दूर होण्यास मदत होते. प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स असलेला आहार घ्यावा. यामुळं हाडं मजबूत होतात आणि लठ्ठपणाची समस्याही कमी होते.
2) मेनोपॉझच्या काळात स्त्रियांना झोप न मिळाल्याने तणावाला तोंड द्यावं लागतं. मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी दररोज रात्री किमान आठ तासांची झोप घ्यावी. यामुळे राग आणि चिडचिडेपणाची समस्या दूर होऊ शकते. तसंच शरीरात हॅप्पी हार्मोन्स स्रवतात आणि कॉर्टिसॉलची पातळी नियंत्रित ठेवता येते.
3) मेडिटेशन आणि व्यायामासाठी सकाळी आणि संध्याकाळी थोडा वेळ काढावा. त्यामुळे मानसिक आणि भावनिक आरोग्याला प्रोत्साहन मिळू शकतं. यासोबतच शरीरातल्या वाढत्या वेदना आणि क्रॅम्प्सही कमी होऊ लागतात. दिवसातून 30 मिनिटं व्यायाम केल्याने शरीराची ऊर्जा पातळी वाढते.
4) एकाकीपणामुळे चिंता, मेनोपॉझल डिप्रेशन आणि तणाव निर्माण होऊ लागतो. अशा परिस्थितीत मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवावा आणि बाहेर फिरायला जावं. सोशल सर्कल वाढवण्याचा प्रयत्न करावा.
5) दिवसभर ऑफिस आणि घरच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासोबतच स्वतःसाठीही वेळ काढावा. चित्रकला, संगीत, स्वयंपाक किंवा तुमच्या आवडीच्या कोणत्याही छंदासाठी वेळ काढावा. यामुळे तणाव टाळता येतो.
