कपड्यांबद्दल सांगणारी एक वेबसाईट trendalytics.co मध्ये दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही 3-3-3 हा नियम वापरून तुमच्या कपड्यांचे स्टाईल सेट करू शकता. या ट्रिकच्या मदतीने तुम्ही कमी कपड्यांमध्ये अनेक स्टाईल करू शकता. जी प्रत्येकवेळी वेगळी दिसेल आणि तितकीच कूलदेखील. तसेच तुम्हाला वारंवार कपडे विकत घेण्याचीही गरज पडणार नाही.
काय आहे 3-3-3 ची ट्रिक?
advertisement
तुम्हाला नेहमी कोणते कपडे घालावे? हे तर मी नेहमीच घालतो.. किंवा आज वेगळं काहीतरी हवंय.. असं वाटत असेल तर ही ट्रिक तुमच्या खूप फायद्याची आहे. यामध्ये तुम्हाला तुमचे 3-3-3 या ट्रेकने सेट करायचे आहे. हे खूप सोपे फक्त तुम्हाला तुमच्या कपाटातून हुशारीने कपड्यांची निवड करावी लागेल.
फॉलो करा ही ट्रिक..
- सर्वात आधी तुमच्या कपातून कपडे बाहेर काढा आणि बेडवर ठेवा. यामुळे तुमच्याकडे कोणकोणते आणि किती कपडे आहेत हे स्पष्टपणे कळेल.
- त्यानंतर तुमचे आवडते कपडे निवडा. तुमचे आवडते टॉप 3 शर्ट-टीशर्ट, 3 बॉटम आणि तुम्हाला कम्फर्टेबल असलेले 3 जोडी शूज निवडा.
- तुमचे हे 9 पीस सहजपणे मिक्स आणि मॅच होऊ शकतात की नाही याची खात्री करा. काळा, पांढरा, बेज, नेव्ही किंवा राखाडी रंगांसारखे रंग निवडा.
- हे कपडे मिक्स अँड मॅच करून तुम्ही किती लुक बनवू शकता हे पाहा. प्रत्येक कॉम्बिनेशन ट्रे करून पाहा आणि ठरवा.
- हवे असल्या तुम्ही त्यावर वेगवेगळ्या ऍक्सीसरीज घेऊ शकता. जसे की, स्कार्फ, बेल्ट किंवा हॅट. जे तुम्हाला आवडत असेल.
अशाच प्रकारे तुम्ही इतरही काही कॉम्बिनेशन ट्राय करून पाहू शकता. तुमचा कदाचित एक दिवस यामध्ये जाईल. पण सकाळी होणारी धावपळ आणि मनस्ताप कमी होई. तुम्हाला माहित असेल कि आज कोणत्या पॅन्टसोबत कोणता शर्ट किंवा टीशर्ट घालायचा आहे आणि कोणता शूज..
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
