advertisement

450 दुर्मिळ वस्तू, हडप्पा संस्कृतीचा इतिहास आता प्रत्यक्ष पाहता येणार, मुंबईत इथं खास प्रदर्शन, Video

Last Updated:

या प्रदर्शनामुळे हडप्पा (सिंधू-सरस्वती) संस्कृतीपासून गुप्तकालापर्यंतचा इतिहास केवळ पुस्तकापुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष पुराव्यांच्या माध्यमातून पाहता आणि अभ्यासता येणार आहे.

+
मुंबईत

मुंबईत CSMVS मध्ये प्राचीन भारताच्या जागतिक संबंधांचे खास प्रदर्शन; हडप्पा संस्कृतीचा इतिहास आता प्रत्यक्ष पाहता येणार

मुंबई : प्राचीन भारताचा जागतिक इतिहासातील सहभाग नव्या दृष्टिकोनातून मांडणारी Networks of the Past ही विशेष अभ्यास गॅलरी आता छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय येथे सुरू करण्यात आली आहे. या प्रदर्शनामुळे हडप्पा (सिंधू-सरस्वती) संस्कृतीपासून गुप्तकालापर्यंतचा इतिहास केवळ पुस्तकापुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष पुराव्यांच्या माध्यमातून पाहता आणि अभ्यासता येणार आहे.
या गॅलरीत एकूण 450 दुर्मिळ पुरातत्त्वीय वस्तू प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. भारतासह सुमारे 15 देशांतील संग्रहालयांमधून या वस्तू एकत्र आणण्यात आल्या असून, प्राचीन भारताचे मेसोपोटेमिया, इजिप्त, ग्रीस, रोम, पर्शिया आणि चीन यांसारख्या संस्कृतींशी असलेले व्यापार, सांस्कृतिक आणि बौद्धिक संबंध यातून स्पष्ट होतात. प्राचीन संस्कृती एकमेकांपासून वेगळ्या नसून सातत्याने संवाद आणि देवाणघेवाणीद्वारे विकसित झाल्या, हा मुख्य संदेश या प्रदर्शनातून दिला जात आहे.
advertisement
हा प्रकल्प Getty च्या Sharing Collections Programme अंतर्गत साकारण्यात आला असून, चार वर्षांच्या कालावधीत त्याची आखणी करण्यात आली. या प्रदर्शनासाठी ब्रिटिश म्युझियम, स्टॅटलिचे मुसेन झू बर्लिन, म्युझियम रिएटबर्ग, बेनाकी म्युझियम यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे सहकार्य लाभले आहे.
advertisement
तसेच भारतातील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, राष्ट्रीय संग्रहालय, भारतीय संग्रहालय, बिहार म्युझियम (पटना), तसेच महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व आणि संग्रहालय संचालनालयाचाही सहभाग आहे.
विद्यार्थी आणि अभ्यासकांसाठी ही गॅलरी एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रम ठरणार आहे. देशभरातील विद्यापीठांमध्ये प्राचीन भारतीय इतिहासाचा अभ्यास केला जात असला तरी जागतिक संस्कृतींशी असलेले परस्परसंबंध आणि त्यांचे वस्तुनिष्ठ पुरावे प्रत्यक्ष पाहण्याची संधी मर्यादित होती. या पार्श्वभूमीवर University Academic Programme चीही सुरुवात करण्यात आली आहे. 2024 मध्ये सुरू झालेला हा कार्यक्रम Fitzwilliam Museum यांच्या सहकार्याने राबविण्यात आला असून, 2026 मध्ये भारतीय विद्यापीठातील प्राध्यापकांसाठी चार दिवसांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
advertisement
या कार्यक्रमांतर्गत संग्रहालयातील वस्तूंच्या प्रत्यक्ष अभ्यासावर भर दिला जाणार आहे. भारत, इजिप्त, ग्रीस, इराण आणि चीन येथील तज्ज्ञ सहभागी होऊन प्राचीन संस्कृतींच्या परस्परसंबंधांवर चर्चा करतील. संग्रहालय-आधारित शिक्षण पद्धतीला चालना देणे आणि इतिहास अभ्यासात प्रत्यक्ष पुराव्यांचे महत्त्व अधोरेखित करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
वस्तुसंग्रहालयाचे इतिहास संशोधक स्वरराज दाते यांनी सांगितले की, Networks of the Past ही गॅलरी प्राचीन भारताचे जागतिक महत्त्व पुराव्यांसह दाखवणारा महत्त्वाचा शैक्षणिक उपक्रम आहे. विद्यार्थ्यांना वस्तूंमधून इतिहास समजून घेण्याची चांगली संधी यातून मिळते. सोमय्या कॉलेजचे डायरेक्टर, सोमय्या कॉलेज यांनी सांगितले की, अशा प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकाबरोबरच प्रत्यक्ष पुराव्यांच्या आधारे इतिहास शिकता येतो आणि अभ्यासाला नवी दिशा मिळते.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
450 दुर्मिळ वस्तू, हडप्पा संस्कृतीचा इतिहास आता प्रत्यक्ष पाहता येणार, मुंबईत इथं खास प्रदर्शन, Video
Next Article
advertisement
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल; गुंतवणूकदारांच्या काळजाचा ठोका चुकला
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल
  • चांदी 8800 रुपयांनी स्वस्त

  • सोन्याचे भाव पत्त्यासारखे कोसळले

  • सोन्या-चांदीच्या किंमतीत ऐतिहासिक 'फ्री-फॉल'

View All
advertisement