TRENDING:

Kids Mental Health : मुलांना अजिबात विचारू नका 'हे' 5 प्रश्न! डॉक्टर म्हणाले, मनावर होऊ शकतो चुकीचा परिणाम

Last Updated:

Kids Mental Health : मुलांना आपण काही साधे प्रश्न अगदी सहज विचारतो, सगळेच विचारतात. पण पिडीयाट्रीशन डॉ. अजय प्रकाश यांनी सांगितलं की, आपल्याला साध्या वाटणाऱ्या काही प्रश्नांमुळे मुलांच्या मनावर चुकीचा परिणाम होऊ शकतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुलांच्या मनावर कोणत्या गोष्टीचा कसा परिणाम होईल हे आपल्याला सहज कळत नाही. म्हणून त्यांच्यासोबत कोणतंही काम करताना किंवा त्यांच्याशी बोलताना आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते. काही मुलं स्ट्रॉन्ग असतात, त्यांना फारसा फरक पडत नाही. पण काही मूळ खूप हळवी असतात आणि त्यांना आपले काही प्रश्न दुखावू शकतात.
या प्रश्नांमुळे मुलांचा उडतो गोंधळ..
या प्रश्नांमुळे मुलांचा उडतो गोंधळ..
advertisement

मुलांना आपण काही साधे प्रश्न अगदी सहज विचारतो, सगळेच विचारतात. पण पिडीयाट्रीशन डॉ. अजय प्रकाश यांनी सांगितलं की, आपल्याला साध्या वाटणाऱ्या काही प्रश्नांमुळे मुलांच्या मनावर चुकीचा परिणाम होऊ शकतो. कमी वयाच्या कोणत्याच मुलांना हे प्रश्न विचारू नका.

या प्रश्नांमुळे मुलांचा उडतो गोंधळ..

तुझं जास्त प्रेम कोणावर आहे, आईवर की बाबांवर?

advertisement

आता तुम्हाला वाटेल हा प्रश्न किती साधारण आहे. म्हणजे हे तर आपण गंमतीगमतीमध्ये मुलांना विचारतो. पण डॉक्टरांच्यामते, हा प्रश्न मुलांना गोंधळात टाकू शकतो. तुम्हाला मुलांसमोर शक्यतो पॉझिटिव्ह आणि चांगल्या गोष्टी बोलल्या पाहिजे. या प्रश्नाऐवजी तुम्ही मुलांना म्हणून शकता की, 'दोघांचंही प्रेम तुला मिळत आहे, तू खरंच नशीबवान आहे.'

मोठे झाल्यावर तुला काय बनायचं आहे?

advertisement

हा प्रश्न मुलांसाठी तसा त्रासदायक नाही, पण याऐवजी तुम्ही मुलांना जर असं विचारलं की, 'हल्ली तुला कोणत्या गोष्टींबद्दल कुतूहल वाटतंय किंवा तुला काय करायला आवडत आहे.' तर तुम्ही मुलांच्या आवडी निवडीनुसर त्यांना प्रोत्साहन देऊ शकता. त्यांना ज्या गोष्टी आवडतात, त्यामध्ये त्यांना अधिक माहिती देऊ शकता किंवा त्याचे काही क्लासेस असतील तर त्यामध्ये मुलांना टाकू शकता.

advertisement

तू एका जागी शांत का बसू शकत नाहीस?

हे वाक्य मुळातच नकारात्मक आहे. यामुळे मुलांच्या मनावर नकारात्मकच परिणाम होतो. मुलांना असं वाटू शकतं की, आपण खूप काहीतरी चुकीचं करत आहोत किंवा मुलांना रागावल्यामुळे तेही रागात पुन्हा पुन्हा तसं वागू शकतात. त्याऐवजी तुम्ही मुलांना म्हणालात की, 'तू जरा वेळ बसतोच का किंवा तुला थोड्या आरामाची गरज आहे, जरा बसतोस का' यामुळे मुलं प्रेमाने तुमचं ऐकतील.

advertisement

आता तू मोठा/मोठी, झालास/झालीस. लहान बाळासारखं का वागत आहेस?

या वाक्यांमुळे मुलांचा गोंधळ उडतो. मुलांचा मेंदू अजूनही त्यादृष्टीने विकसित होत असतो. म्हणून त्यांना आपण मोठे झालो आहोत की लहान, आपण कसं वागायला हवं हे कळत नाही. याऐवजी मुलांना मायेनं जवळ घ्या आणि त्यांना समजावून सांगा. मुलांना म्हणा, 'तुला सध्या आधाराची आणि मायेची गरज आहे.'

तुला नेमकं काय झालं आहे? तू असं का वागत आहेस?

मुलांना असं बोलल्यानंतर ते कोणत्या त्रासात असले तर तो त्रास आणखी वाढतो आणि मुलांना कोणाला काही सांगता येत नाही आणि सांगावंसं वाटतही नाही. अशावेळी मुलांशी प्रेमानं बोला आणि विश्वासात घ्या. त्यांना म्हणा, 'मला कळतंय की तुझं काहीतरो बिनसलंय, तुला कशाचातरी त्रास होतोय. तुला मदत करण्यासाठी मी इथेच आहे.'

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
4 तासांचा कॅफे, नोकरी सांभाळत करतात व्यवसाय, दोन इंजिनिअर मित्रांची कहाणी, Video
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kids Mental Health : मुलांना अजिबात विचारू नका 'हे' 5 प्रश्न! डॉक्टर म्हणाले, मनावर होऊ शकतो चुकीचा परिणाम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल