लिंबू सोबत खाऊ नका हे 4 पदार्थ :
दही : लिंबू सोबत दहीचे सेवन करू नये. लिंबूमध्ये असलेले ऍसिड दहीतील चांगल्या बॅक्टेरियांना नष्ट करते. अशात जर लिंबू आणि दहीचे एकत्र सेवन केल्यास ऍसिडिटीची समस्या होऊ शकते.
दूध : जर तुम्ही लिंबू खाण्यासोबत दूध सुद्धा पित असाल तर यामुळे गॅस, अपचन होऊ शकते. दूध आणि लिंबू या दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्याने लिंबाचा असलेले ऍसिड एलिमेंट दुधातील प्रोटीनना फाडते, यामुळे तुमची पचनक्रिया खराब होऊ शकते.
advertisement
Jaggery Benefits : 4 प्रकारचा गूळ आरोग्यासाठी फायदेशीर, शरीरातील आयरन आणि रक्ताची कमतरता होईल दूर
मासे : बऱ्याचदा अनेकजण माशांवर लिंबू पिळून त्यांचे सेवन करतात. मात्र यामुळे पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. लिंबूचा रस माशांसोबत खाल्ल्याने त्याला पचवण्यास समस्या निर्माण होते आणि माशातून मिळणारे पोषकतत्व आपल्याला मिळत नाहीत.
अंड : अंड्यासोबत तुम्ही लिंबूचे सेवन करू नका. अंड आणि लिंबूचे एकत्र सेवन केल्याने अपचनाची समस्या निर्माण होऊ शकते. तसेच लिंबू कितीही चांगला असला तरी जास्त प्रमाणात त्याचे सेवन करू नये. यामुळे पोटात जळजळ, ऍसिडिटी आणि तोंडात इंफेक्शन होते.