TRENDING:

केवळ महिलाच नाही, तर पुरुषांमध्येही होतात हार्मोनल चेंजेस; विशी-तिशीतील तरुणांमध्ये उद्भवतेय ही समस्या, जाणून घ्या महत्त्वाची कारणं

Last Updated:

विज्ञानानुसार, पुरुषांच्या शरीरातही तितकेच महत्त्वाचे हार्मोनल बदल होत असतात. मात्र, "पुरुष कधी रडत नाहीत" किंवा "पुरुष नेहमी कणखरच असायला हवेत" या सामाजिक दबावामुळे अनेक पुरुष आपल्या शारीरिक आणि मानसिक तक्रारींकडे दुर्लक्ष करतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
मुंबई : आपण अनेकदा ऐकतो की महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल झाल्यामुळे त्यांना मूड स्विंग्स, थकवा किंवा इतर शारीरिक त्रासांना सामोरे जावे लागते. पण, 'हार्मोन्सचा खेळ' हा फक्त स्त्रियांपुरता मर्यादित आहे, हा एक मोठा गैरसमज आहे. विज्ञानानुसार, पुरुषांच्या शरीरातही तितकेच महत्त्वाचे हार्मोनल बदल होत असतात. मात्र, "पुरुष कधी रडत नाहीत" किंवा "पुरुष नेहमी कणखरच असायला हवेत" या सामाजिक दबावामुळे अनेक पुरुष आपल्या शारीरिक आणि मानसिक तक्रारींकडे दुर्लक्ष करतात.
AI Generated photo
AI Generated photo
advertisement

आजच्या काळात एक धक्कादायक वास्तव समोर येत आहे. पूर्वी वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर पुरुषांमधील मुख्य हार्मोन म्हणजेच 'टेस्टोस्टेरॉन' (Testosterone) कमी व्हायचे. पण आता 20 ते 30 वयोगटातील तरुणांमध्येही याची पातळी झपाट्याने खाली घसरत आहे. टेस्टोस्टेरॉन फक्त लैंगिक आरोग्याशी संबंधित नसून ते तुमचे स्नायू, हाडांची मजबूती, ऊर्जेची पातळी आणि तुमचा स्वभाव (Mood) यावरही नियंत्रण ठेवते.

advertisement

काय आहे टेस्टोस्टेरॉन आणि ते का कमी होतंय?

टेस्टोस्टेरॉन हे पुरुषांच्या शरीरातील सर्वात महत्त्वाचे हार्मोन आहे. वयाची 30 वर्षे पूर्ण झाल्यानंतर नैसर्गिकरित्या दरवर्षी यात 1 टक्क्याने घट होते, जे सामान्य आहे. मात्र, सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात ही घट नैसर्गिक वेळेच्या खूप आधीच आणि वेगाने होत आहे. नवी दिल्लीतील एलेंटिस हेल्थकेअरचे डॉ. मन्नान गुप्ता यांनी यामागील 4 प्रमुख कारणे स्पष्ट केली आहेत:

advertisement

1. मानसिक ताण (Stress):

ऑफिसचे काम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे शरीरात 'कोर्टिसोल' (स्ट्रेस हार्मोन) वाढते. हे हार्मोन थेट टेस्टोस्टेरॉनची निर्मिती रोखून धरते.

2. झोपेचा अभाव:

आपल्या शरीरात टेस्टोस्टेरॉनची निर्मिती प्रामुख्याने आपण जेव्हा गाढ झोपेत असतो, तेव्हाच होते. रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या तरुणांमध्ये या हार्मोनची पातळी आपोआप घटते.

3. वाढते वजन आणि चुकीचा आहार:

advertisement

जंक फूड आणि साखरेच्या अतिसेवनामुळे पोटाचा घेरा वाढतो. शरीरातील ही अतिरिक्त चरबी टेस्टोस्टेरॉनला चक्क 'इस्ट्रोजेन' (स्त्री संप्रेरक) मध्ये बदलू लागते, जे पुरुषांसाठी घातक आहे.

4. घातक रसायने आणि प्लास्टिक:

रोजच्या वापरातील प्लास्टिकच्या वस्तू आणि अन्नातील कीटकनाशके आपल्या हार्मोन्सच्या संतुलनावर वाईट परिणाम करत आहेत.

नैसर्गिकरित्या 'टेस्टोस्टेरॉन' कसे वाढवावे?

जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल किंवा चिडचिड होत असेल, तर घाबरून न जाता जीवनशैलीत हे छोटे बदल करा:

आठवड्यातून किमान 3-4 दिवस वेट लिफ्टिंग (वजन उचलण्याचे व्यायाम) करा. यामुळे टेस्टोस्टेरॉन वाढण्यास मोठी मदत मिळते.

दररोज 7 ते 8 तासांची शांत आणि गाढ झोप घेणे हे कोणत्याही औषधापेक्षा जास्त प्रभावी आहे.

साखर आणि जंक फूड पूर्णपणे बंद करा. पोटाची चरबी कमी करणे हा या समस्येवरचा सर्वोत्तम उपाय आहे.

शरीरात व्हिटॅमिन-डी कमी झाले की हार्मोन्सचे संतुलन बिघडते. त्यामुळे रोज सकाळी थोडा वेळ कोवळ्या उन्हात बसा.

पुरुष यावर का बोलत नाहीत?

आपल्या समाजात पुरुषाने आपली कमजोरी सांगणे हे कमीपणाचे मानले जाते. "मी थकलोय" किंवा "मला मानसिक त्रास होतोय" असे सांगायला पुरुष कचरतात. पण ही गप्प बसण्याची वृत्ती भविष्यात डिप्रेशन, हाडांची ठिसूळता आणि वंध्यत्वासारख्या मोठ्या समस्यांना निमंत्रण देऊ शकते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हातात आलेलं पीक अवकाळीने गेलं, द्राक्षांचे 25 लाखांचे नुकसान, शेतकरी संकटात
सर्व पहा

पुरुषांनी आपल्या आरोग्याकडे 'मॅनली' इमेजच्या चष्म्यातून न पाहता विज्ञानाच्या नजरेतून पाहणे गरजेचे आहे. वेळीच दिलेले लक्ष आणि बदललेली जीवनशैली तुम्हाला पुन्हा उमेदीने जगण्यास मदत करू शकते.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
केवळ महिलाच नाही, तर पुरुषांमध्येही होतात हार्मोनल चेंजेस; विशी-तिशीतील तरुणांमध्ये उद्भवतेय ही समस्या, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल