जाणून घेऊयात भेंडी खाण्याचे फायदे.
मधुमेह
भेंडीत असलेलं म्युसिलेज (mucilage) आणि फायबर रक्तातील साखर शोषून घेण्यास मदत करतात. त्यामुळे रक्तात साखरेचं प्रमाण कमी राहिल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो. भेंडी भिजवून ठेवलेलं पाणी उकळून ते काढा म्हणून प्यायल्यास फायद्याचं ठरतं.
हार्ट ॲटॅक
भेंडीतले पोटॅशियम आणि फायबर हृदयासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी होऊन हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता मावळते.
advertisement
गर्भवती महिलांसाठी फायदेशीर
भेंडीमध्ये फॉलिक ॲसिड भरपूर प्रमाणात असल्यामुळे ती गर्भवती महिलांसाठी फायदेशीर आहे.याशिवाय भेंडी गर्भाच्या निरोगी वाढीसाठी उपयोगी ठरतात.
पचन सुधारतं
भेंडीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. भेंडीतील चिकट पदार्थ आतड्यांना संरक्षण देतात आणि पचनक्रियेत सहाय्य करतात.
त्वचेसाठी फायद्याचं
भेंडीतले अँटीऑक्सिडंट्स त्वचेतील पेशींचे संरक्षण करतात आणि त्वचा तजेलदार ठेवण्यास मदत करतात.भेंडीचा रस किंवा पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास त्वचा नरम आणि चमकदार होते.
प्रतिकारशक्ती वाढवते
भेंडीमध्ये व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात आणि विविध रोगांच्या संक्रमणापासून बचाव करतात.
हाडं मजबूत होतात
भेंडीतील कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हाडांची घनता वाढवतात. त्यामुळे हाडं मजबूत होऊन ठिसूळ होण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारांवर भेंडी फायदेशीर ठरते.
वजन कमी होतं
भेंडीमध्ये कमी कॅलरीज असून फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ती वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. ती भूक कमी करण्यासाठी मदत करते आणि दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते.
डोळ्यांचे आरोग्य सुधारतं
भेंडीमध्ये व्हिटॅमिन A आणि बीटा-कॅरोटीन असतात, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. सतत भेंडी खाल्ल्यामुळे मोतीबिंदू होण्याची शक्यता कमी होते.
तणाव कमी होतो
भेंडीमध्ये मॅग्नेशियम भरपूर असतं. त्यामुळे मानसिक ताण कमी होतो. भेंडी नियमित खाल्ल्याने मानसिक आरोग्य सुधारायला मदत होते.