Diabetes gripping Mumbaikar: तरूणांनो सावधान: ‘या’ चुकीच्या सवयीमुळे तुम्हाला होऊ शकतो डायबिटीस; आत्ताच बदला या सवयी नाहीतर येईल पश्चातापाची पाळी
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Diabetes Gripping Mumbaikars: मुंबईसारख्या शहरात अनेक तरूण डायबिटीसच्या विळख्यात अडकू लागले आहेत. जंकफूड, बदलती जीवनशैली ही यामागची काही प्रमुख कारणं जरी असली तरीही मुंबईकरांना डायबिटीसचा विळखा बसतोय तो सतत बसून काम करणं आणि लठ्ठपणामुळे.
मुंबई: मुंबई ही देशाची अर्थिक राजधानी. मात्र आता या शहराला एक नको असलेली ओळख मिळू लागलीये. ती ओळख म्हणजे डायबिटीस सिटी. कधी न थांबणाऱ्या मुंबईला आता डायबिटीसने विळखा घालायला सुरूवात केलीये. गेल्या 10 वर्षांत डायबिटीसच्या रूग्णांच्या तब्बल 485 टक्क्यांनी वाढ झाल्याचं एका सर्वेक्षणात दिसून आल होतं. मुंबईसारख्या शहरात अनेक तरूणही डायबिटीसच्या विळख्यात अडकू लागले आहेत. जंकफूड, बदलती जीवनशैली ही यामागची काही प्रमुख कारणं जरी असली तरीही मुंबईकरांना डायबिटीसचा विळखा बसण्यामागची कारणं आहेत ती म्हणजे सतत बसून काम करणं आणि लठ्ठपणा. त्यामुळे तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने तुमच्या ऑफिसमध्ये बसून काम करत असाल तर तुम्हाला ही सवय सोडावी लागणार आहे. अन्यथा डायबिटीसे तुम्हाला मगरमिठी मारलीच म्हणून समजा.
मुंबईकरांमध्ये डायबिटीस, हाय ब्लडप्रेशर, हार्ट ॲटॅक सारख्या गंभीर आजाराचं प्रमाण वेगाने वाढतंय. व्यायामाचा अभाव, जेवणाची बदलेली पद्धत आणि जंकफूड ही महत्वाची कारणं आहेत. या चुकीच्या सवयींमुळे टाइप 2 डायबिटीसच्या रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसून आलंय.
advertisement
चुकीच्या सवयी कोणत्या ?
- अधिक वेळ उपाशी राहणे
- सतत तणावात असणे
- जास्तित जास्त वेळ बसून काम करणे
- वेळी अवेळी, अरबट चरबट खाणे
- अपुरी झोप
- धुम्रपान आणि मद्यपान
डायबिटीसचा धोका टाळण्यासाठी काय करावं?
- एकाच जागी जास्त वेळ बसून काम करू नका. काम करत असताना दर अर्ध्या तासाने ब्रेक घेऊन थोडं चाला.
- फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, प्रथिने असलेला संतुलित आहार घ्या. जंक फूड खाणं टाळा.
- तणाव कमी करण्यासाठी योगासने करा.
- साखरेचं प्रमाण मर्यादित ठेवा.
- झोप आणि विश्रांतीचं योग्य व्यवस्थापन करा.
- धूम्रपान, मद्यपान सोडून द्यावं.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 03, 2024 6:57 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Diabetes gripping Mumbaikar: तरूणांनो सावधान: ‘या’ चुकीच्या सवयीमुळे तुम्हाला होऊ शकतो डायबिटीस; आत्ताच बदला या सवयी नाहीतर येईल पश्चातापाची पाळी