याशिवाय भेंडीला आयुर्वेदातही विशेष महत्त्व आहे. मात्र फक्त भेंडीच नाही तर भेंडीचं पाणी देखील आरोग्यासाठी खूप फायद्याचं ठरू शकतं.
जाणून घेऊयात भेंडीचं पाणी पिण्याचे फायदे
सर्वसामान्यपणे भेंडीला इंग्रजीमध्ये लेडी फिंगर जरी म्हणत असले तरीही भेंडीचं पाणी हे ओक्रा वॉटर नावाने जास्त प्रसिद्ध आहे. भेंडीमध्ये विरघळणारं फायबर असतं, जे आतड्यांच्या आरोग्यासाठी फायद्याचं ठरतं. भेंडी पाण्यात उकळून ते पाणी नियमितपणे प्यायलं तर ते आपल्या शरीरातील अशुद्ध पदार्थ सहज शरीराबाहेर काढून टाकायला मदत होते. भेंडीचं पाणी प्याल्याने पोट आतून स्वच्छ व्हायला मदत होते. त्यामुळे पचनक्रिया सुधारून अपचन, बद्धकोष्ठता, गॅसेस आणि ॲसिडिटीचा त्रास कमी व्हायला मदत होते. भेंडीच्या पाण्यामुळे शरीरातली अतिरिक्त चरबीही जळायला मदत होते. यकृतापासून मूत्रपिंडापर्यंतच्या अनेक आजारांवर भेंडीचं पाणी खूप फायदेशीर ठरू शकतं. नियमितपणे भेंडीचं पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढून हंगामी आजारांना दूर ठेवता येतं.
advertisement
डायबिटीसच्या रूग्णांसाठी फायद्याचं :
मधुमेहाच्या रुग्णांसाठीही भेंडीचं पाणी फायदेशीर आहे. त्यामध्ये असलेले घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. त्यामुळे नियमितपणे भेंडीचं पाणी प्यायल्यामुळे रक्तातील डायबिटीस नियंत्रणात ठेवता येतो.
हृदयरोगांवर वरदान भेंडी :
भेंडीमध्ये पोटॅशियम आणि फोलेटसारखे घटक आढळतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यास भेंडीचं पाणी फायद्याचं ठरू शकतं. भेंडीच्या पाण्याचं सेवन केल्याने रक्तातलं कोलेस्ट्रॉलही नियंत्रित राहायला मदत होते. ज्यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं.
त्वचेच्या आरोग्यासाठी फायद्याची भेंडी :
भेंडीत असलेल्या व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेचं आरोग्य सुधारायलाही मदत होते. यामुळे त्वचा हायड्रेट राहून सुरकुत्या आणि मुरुमांचा त्रास कमी होतो.
डोळ्यांचं आरोग्य सुधारतं :
गाजर आणि बीट खाल्ल्याने दृष्टीदोष कमी होतात हे आपल्याला माहिती आहेच. मात्र भेंडी ही सुद्धा डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायद्याची आहे.भेंडीमध्ये व्हिटॅमिन A आणि बीटा-कॅरोटीन असतात, नियमितपणे भेंडी खाल्ल्यामुळे मोतीबिंदू होण्याची शक्यता कमी होते.
वजन कमी होतं :
भेंडीमध्ये कमी कॅलरीज आणि जास्त प्रमाणात फायबर्स असतात. त्यामुळे भेंडी खाल्ल्यामुळे पोट भरलेलं राहून भूक कमी लागते आणि वजन नियंत्रणात राहायला मदत होते.
गर्भवती महिलांसाठी फायद्याची :
भेंडीमध्ये फॉलिक ॲसिड भरपूर प्रमाणात असल्यामुळे ती गर्भवती महिलांसाठी फायदेशीर आहे. याशिवाय भेंडी खाणं हे गर्भाच्या वाढीसाठीही फायद्याचं आहे.