TRENDING:

Saree Reuse : आईच्या जुन्या साडीचा ड्रेस तर शिवला, पण आणखी काय करता येईल? इथे पाहा भन्नाट आयडिया

Last Updated:

Old Saree Reuse Ideas : साडीचा ड्रेस तर सगळेच शिवतात. खरं तर साडीचा वापर करण्याचा तो अगदी उत्तम मार्ग आहे. पण साड्यांचे ड्रेस प्रत्येकालाच आवडत नाही. अशावेळी साडीचा पान्हा वापर कसा करायचा का प्रश्न पडतो. तुमच्या या प्रश्नावर इथे उत्तम उत्तर दिली आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आपल्याकडे कोणतीही वस्तू सहजपणे फेकून देणं बऱ्याच लोकांना आवडत नाही. मुलांना लहानपणापासूनच 'टाकाऊपासून टिकाऊ' असा वस्तूंचा पुरेपूर पुनर्वापर करण्याची शिकवण दिली जाते. मग आईच्या किंवा आपल्याही जुन्या साड्या आपण सहज कशा टाकून देणार.. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी साडीचा पुनर्वापर करण्याच्या काही भन्नाट कल्पना घेऊ आलो आहोत.
साड्यांचा असा करा पुनर्वापर
साड्यांचा असा करा पुनर्वापर
advertisement

साडीचा ड्रेस तर सगळेच शिवतात. खरं तर साडीचा वापर करण्याचा तो अगदी उत्तम मार्ग आहे. पण साड्यांचे ड्रेस प्रत्येकालाच आवडत नाही. अशावेळी साडीचा पान्हा वापर कसा करायचा का प्रश्न पडतो. तुमच्या या प्रश्नावर इथे उत्तम उत्तर दिली आहेत. चला पाहूयात साड्यापासून आपण कोणकोणत्या वस्तू बनवू शकतो.

साड्यांचा असा करा पुनर्वापर..

advertisement

पडदे : सर्वात आधी साड्यांपासून आपण पडदे बनवू शकतो. तुमच्या काही सद्य असतील त्या पातळ शायनी आणि काहींच्या कमी डिझाईनच्या असतील तर त्या पडदे बनवण्यासाठी बेस्ट असतात. यामुळे अगदी कमी पैशांमध्ये तुमचे घर सुंदर दिसू शकते. शिवाय तुमच्या घरातील पडदे इतरांच्या पडद्यांपेक्षा अगदीच वेगळे आणि युनिक दिसतील.

कुशन कव्हर्स : साड्यांपासून तुम्ही कुशाण कव्हरही बनवू शकता. यासाठी कॉटनच्या साड्या उत्तम असतात. केवळ कुशाण कव्हर नाही तर तुम्ही साड्यांपासून गाद्यांचे कव्हरदेखील बनवू शकता.

advertisement

ड्रेस : जुन्या साड्यापासून तुम्ही पन्जाबी ड्रेस म्हणजेच सलवार कुर्ती बनवू शकता. खूप हेव्ही वर्कच्या साड्या असतील तर त्यापासून अनारकली सूटदेखील बनवला जाऊ शकतो. काही काठपदर साड्यांचे तुम्ही वन पीस ड्रेसेस देखील बनवू शकता. असेच वन पीस ड्रेस तुम्ही नेटच्या साड्यांचेदेखील बनवू शकता.

टेबल किंवा सोफा रनर : साड्यांचे पदर कापून तुमही त्यापासून टेबल किंवा सोफा रनर बनवू शकता. बाजारात मिळणारे रनर खूप महाग असतात. त्याऐवजी तुम्ही घरीच वेगवेगळ्या पत्रकाराचे अनेक रनर बनवून मूडनुसार ते वापरू शकता.

advertisement

डोअरमॅट : जुन्या साड्या ज्या तुम्ही पुन्हा कोणत्याच स्वरूपात घालू शकत नाही किंवा घरात सजावटीसाठीही वापरू शकत नाही अशा साड्यांचे तुम्ही डोअरमॅट म्हणजेच पायपुसणी बनवू शकता.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
‎वर्दीतला सुरेल आवाज, नोकरी सांभाळून गातात गाणी, अरुण यांचा अनोखा छंद, Video
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Saree Reuse : आईच्या जुन्या साडीचा ड्रेस तर शिवला, पण आणखी काय करता येईल? इथे पाहा भन्नाट आयडिया
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल