ऑलिव्ह ऑईल
ऑलिव्ह ऑईल आणि मोहरीच्या तेलामध्ये विविध गुणधर्म आहेत. पण हृदयाच्या आरोग्याच्या बाबतीत हे दोन्ही थोडे वेगळे आहेत. ऑलिव्ह ऑईलमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. हे मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स विशेषतः ऑलिक ॲसिड, जे खराब कोलेस्टेरॉलची (LDL) पातळी कमी करण्यात आणि चांगल्या कोलेस्टेरॉल (HDL) पातळी वाढवण्यात फायद्याचे ठरतात. ऑलिव्ह ऑईलमध्ये पॉलिफेनॉल्स आणि व्हिटॅमिन ई सारखे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स देखील असतात, जे जळजळ कमी करण्यास मदत करतात.
advertisement
मोहरीचं तेल
भारतात मोहरीच्या तेलाचा वापार जास्त प्रमाणात होतो.मोहरीच्या तेलात फॅटी ॲसिड्स असतात जे रक्त घट्ट होऊन रक्ताच्या गुठळ्या बणण्यास प्रतिबंध करू शकतात. मोहरीच्या तेलात अल्फा-लिनोलेनिक (ALA), ओमेगा-3 फॅटी ॲसिड आणि ओमेगा-6 फॅटी ॲसिड असतात. हे आवश्यक मेदाम्ल ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यासाठी आणि रक्ताच्या गुठळ्या रोखण्यासाठी महत्वाचे आहेत, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होऊ शकतो. मोहरीच्या तेलामध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स देखील असतात आणि त्यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात.
या एका कारणामुळे धोक्याचं ठरतं मोहरीचं तेल
असं म्हणतात फायदे आणि तोटे या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्याचप्रमाणे मोहरीच्या तेलाचे अनेक फायदे जरी असले तरीही मोहरीच्या तेलात असलेलं इरूसिक ॲसिड हे हृदयासाठी धोक्याचं आहे किंवा हृदयविकार आहेत त्यांनी मोहरीचं तेल खाणं टाळावं.
