कोरबा, प्रतिनिधी : जगभरात 13 ऑक्टोबरला जागतिक अंडी दिन साजरा केला जातो. या तारखेहा हा दिवस साजरा करण्याचा उद्देश्य असा आहे की, लोकांना अंडीबाबत महत्त्व समजावे. जागतिक अंडी दिनाच्या पार्श्वभूमीवर लोकल18 च्या टीमने डॉ. सैय्यद आसिफ यांच्याशी संवाद साधला. जाणून घेऊयात, ते काय म्हणाले?
अंडी खाण्याची योग्य वेळ -
advertisement
डॉ. सैय्यद आसिफ यांनी सांगितले की, अंडी सकाळी खायला हवे. सकाळच्या सुमारास नाश्त्यामध्ये उकळलेले अंडी खाल्ल्याने शरीराला दिवसभर ऊर्जा मिळते. अंडी खाल्ल्याने माणसाचे मन आणि शरीर दिवसभर सक्रिय राहते.
बाजारात दोन प्रकारचे अंडी -
बाजारात दोन प्रकारची अंडी मिळतात. एक म्हणजे गावराणी आणि दुसरे म्हणजे फॉर्मचे. फॉर्मचे अंडी खाण्यापेक्षा गावराणी अंडी खाणे अधिक फायदेशीर आहे.
काय होतो फायदा -
डॉ. सैय्यद आसिफ यांनी पुढे सांगितले की, सध्या प्रोटीन सप्लिमेंट्सची मागणी वाढत आहे. लोक बाजारातून महागडे प्रोटीन सप्लिमेंट्स विकत घेत आहेत आणि त्याचे सेवन करत आहेत. मात्र, आहारात अंड्याचा समावेश केल्यास शरीराला भरपूर प्रोटीन मिळतात. त्यामुळे हे शरीरासाठी देखील खूप फायदेशीर आहे.
अंड्यांमध्ये खूप सारे व्हिटामिन असतात. मात्र, त्यात व्हिटामिन डी खूप जास्त आढळते. त्यामुळे अंडी खाल्ल्याने व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता दूर होते. व्हिटॅमिन डी हाडांसाठी फायदेशीर आहे, ते हाडांच्या दुखण्यापासून आराम देते.
डोळ्यांसाठीही फायदेशीर -
सध्याचा काळ पाहाता अनेक ठिकाणी असे दिसून येते की, लहानांपासून मोठ्यांपर्यंत डोळ्यांची समस्या जाणवत आहे. लहान मुलांनाही चश्मा लागत आहे. यामागे सर्वात मुख्य कारण म्हणजे व्हिटामिन ए आणि व्हिटामिन ईची कमी हे आहे. अंड्याचे सेवन केल्याने शरीरात व्हिटामिन ए और व्हिटामिन ईची कमतरता जाणवत नाही. त्याच वेळी, अंड्यांमध्ये आढळणारे सेलेनियम डोळ्यातील मोतीबिंदूशी लढण्यासाठी देखील उपयुक्त ठरते.