काही विशिष्ठ धर्माच्या, पंथाच्या व्यक्ती सोडल्या तर आपल्यापैकी अनेकांच्या जेवणात, भाज्यांमध्ये कांदा आणि लसूण यांचा वापर सर्रासपणे दिसून येतो. त्यामुळे त्यांचे आरोग्यदायी फायदे आपल्याला अप्रत्यक्षपणे मिळतात. मात्र त्यात असलेल्या औषधी गुणधर्मांकडे आपल्यापैकी अनेकांचं दुर्लक्ष होतं. त्यामुळे कांदा आणि लसून एकत्र करून त्यांचं पाणी बनवल्याने आपल्याला विविध आरोग्यादायी फायदे होऊ शकतात. जाणून घेऊयात कांदा आणि लसणाच्या पाण्याचे आरोग्यदायी फायदे, डाएट फॉर डिलाईटच्या आहारतज्ज्ञ खुशबू शर्मा यांच्याकडून.
advertisement
कांदा आणि लसणाच्या पाण्याचे फायदे
रोगप्रतिकारक शक्ती वाढते:
आहारतज्ज्ञांच्या मते, ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांच्यासाठी कांदा आणि लसणाचं पाणी हे कोणत्या मल्टिव्हिटॅमिन टॉनिकपेक्षा कमी नाहीये. कांदा आणि लसूण या दोघांमद्ये अँटीमायक्रोबायल गुणधर्म असतात जे रोगांशी लढण्यास मदत करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला मदत करतात.
रक्तातील साखर नियंत्रित होते :
आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना डायबिटीस म्हणजेच मधुमेहाचा सामना करावा लागतो. मात्र कांदा आणि लसणाचं पाणी प्यायल्याने रक्तातल्या साखरेची पातळी नियंत्रित होण्यास मदत होते. लसूण आणि कांद्याच्या अर्कांमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असतात, जे वाढलेल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतात.
हृदयाचं आरोग्य सुधारतं:
लसूण आणि कांद्याचे पाणी हे हृदयच्या आरोग्यासाठी फायद्याचं मानलं जातं.कांदा आणि लसणात ऑर्गेनोसल्फर संयुगं असतात, ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहते.
पचनक्रिया सुधारते :
लसूण आणि कांद्याचं पाणी हे पचनाच्या समस्यांवर फायदेशीर मानलं जातं. तज्ञांचा दावा आहे की, कांदा आणि लसणाच्या पाण्यामुळे पाचक एंजाइम्सचं उत्पादन वाढायला मदत होते. ज्यामुळे पचनक्रिया सुधारून पचनसंस्था मजबूत होते.
त्वचा तजेलदार होते :
कांदा आणि लसणात क्वेरसेटिन नावाचं एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट चांगल्या प्रमाणात आढळून येतं. आपल्याला माहितीच आहे की, अँटिऑक्सिडंट्मुळे शरीराचं मुक्त रॅडिकल्स पासून रक्षण व्हायला मदत होते. त्यामुळे त्वचेच्या पेशींचं होणारं संभाव्य नुकसान टळतं आणि त्वचा तजेलदार व्हायला मदत होते.
कांदा आणि लसणाच्या पाण्याचे फायदे जाणून घेतल्यानंतर समजून घेऊयात हे पाणी कसं तयार करायचं ते.
लसूण आणि कांद्याचं पाणी कसं तयार करावं?
एका भांड्यात लसणाच्या दोन पाकळ्या आणि अर्धा कांदा कापलेला कांदा टाका. त्यात साधारण अर्धा लीटर पाणी टाका. साधारण 5 ते 10 मिनिटांपर्यंत हे पाणी चांगलं उकळून घ्या. पाणी थंड झाल्यानंतर ते गाळून तुम्ही पिऊ शकता. तुम्ही दैनंदिन आहारात कांदा, लसणाच्या पाण्याचा वापर सुरू केल्यास तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतील.