Surya Mudra Benefits: डायबिटीस वाढलाय ? वजन कमी करायचं आहे ? करा ‘हा’ छोटासा व्यायाम
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Health benefits of Surya Mudra in Marathi: पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश या पंचतत्वांचा थेट संबंध शरीराशी आहे. त्यामुळे जर तुम्हाला निरोगी राहायचं आहे तर या 5 घटकांवर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचे आहे. योगातील मुद्रा विज्ञानाद्वारे आपण या पाच तत्वांवर नियंत्रण ठेवू शकतो.
मुंबई : भारतीय संस्कृतीत योगासनांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. योगासनांचे प्रचंड फायदे जरी असले तरीही दुर्देवाने त्याकडे दुर्लक्षच होताना दिसतंय. अनेकांचा असा समज किंबहुना गैरसमज आहे की, योगासनं केल्याने फक्त वजन कमी होतं. तुम्ही जर नियमितपणे योगासनं करत असाल तर तुम्ही अनेक गंभीर आजारांना आणि विकारांना दूर ठेऊ शकता. योगामध्ये फक्त आसनंच नाहीत तर मुद्रा देखील महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रत्येक योगासनाचं एक विशेष महत्व आहे. जर ही योगासनं नियमितपणे आणि योग्यरित्या केली तर शरीराला अनेक फायदे होऊ शकतात.
योगासनं आणि मुद्रा
प्रत्येक योगासनात एक विशिष्ट मुद्रा असते. योगसाधकांसाठी मुद्रा विज्ञान खूप महत्वाचं आहे. काही योग तज्ञ या आसनाला 'हस्त योग' असंही म्हणतात. मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी, विविध योगासनं आणि प्राणायामांसोबत या मुद्रांचा सराव करणं महत्त्वाचं आहे. योगासनांचा सराव केल्याने शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक फायदे होतात. योगामध्ये अनेक प्रकारच्या आसनांचं आणि मुद्रांचं वर्णन केलं आहे.
advertisement
शरीर आणि पंचतत्वांचा संबंध:
असं म्हटलं जातं की, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश या पंचतत्वांचा थेट संबंध शरीराशी आहे. त्यामुळे जर तुम्हाला निरोगी राहायचं आहे तर या 5 घटकांवर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचे आहे. योगातील मुद्रा विज्ञानाद्वारे आपण या पाच तत्वांवर नियंत्रण ठेवू शकतो. हे घटक हाताच्या बोटांनी आणि अंगठ्याने नियंत्रित केले जाऊ शकतात.
advertisement
- अंगठा - अग्नि तत्त्व
- तर्जनी - वायू तत्त्व
- मधलं बोट - आकाश तत्त्व
- अनामिका - जल तत्त्व
- करंगळी - पृथ्वी तत्त्व
5 तत्वांची माहिती घेतल्या नंतर जाणून घेऊयात सूर्य मुद्रेबद्दल.
सूर्य मुद्रा कशी करावी?

advertisement
सर्वप्रथम, अनामिका वाकवून, अनामिकेच्या टोकाने अंगठ्याला स्पर्श करा. आता अंगठ्याने अनामिकेवर हलका दाब द्या. यामुळे सूर्य मुद्रा ज्याला अग्नी मुद्रा म्हणूनही ओळखलं जातं ती तयार होते. दररोज 5 ते 15 मिनिटे सूर्यमुद्रा आसन केल्याने शरीराला विविध फायदे होतात.
सूर्य मुद्रेचे फायदे
- सूर्य मुद्रा केल्याने रक्तातलं वाईट कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रित राहून चांगल्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं.
- सूर्य मुद्रा केल्याने पचनसंस्था सुधारून गॅसेस, अपचन आणि पोटफुगीच्या समस्यांपासून आराम मिळू शकतो.
- सूर्य मुद्रा केल्याने डायबिटीसही नियंत्रणात राहायला मदत होते.
- नियमितपणे सूर्य मुद्रा केल्याने थायरॉईडचा त्रास होत नाही.
- सूर्य मुद्रा केल्याने मनातली नकारत्मता, भीती, दुःख आणि ताण निघून जायला मदत होते.
advertisement
‘या’ व्यक्तीसाठी सूर्य मुद्रा धोक्याची
सूर्य मुद्रेचे जसे काही फायदे आहेत तसेच काही तोटे सुद्धा आहे. आधी सांगितल्याप्रमाणे आयुर्वेद ,शरीर आणि पंचतत्त्वांचा थेट संबंध आपल्या शरीराशी असतो. याशिवाय प्रत्येक व्यक्तीला पित्त, कफ किंवा वात दोष असू शकतो. त्यामुळे ज्यांना पित्तदोष आहे त्यांनी सूर्यमुद्रा करू नये. कारण ही मुद्रा केल्याने शरीरातल्या पित्ताचं प्रमाण वाढू शकतं. ज्यामुळे तुम्हाला अॅसिडिटीची त्रास जाणवू शकतो. त्यामुळे सूर्य मुद्रा करण्याआधी आयुर्वेदिक डॉक्टरांशी संपर्क साधून तुमच्या दोषाची माहिती करूनच सूर्य मुद्रा करण्याचा सल्ला घ्यावा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 12, 2025 2:30 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Surya Mudra Benefits: डायबिटीस वाढलाय ? वजन कमी करायचं आहे ? करा ‘हा’ छोटासा व्यायाम


