Yoga for digestion: गॅसेस, ॲसिडिटीचा त्रास होतोय? करा ‘ही’योगासने, दूर होतील पोटाचे विकार

Last Updated:

Yoga for digestion in Marathi: योगासने केल्याने फक्त शरीरालाच नाही तर मानसिकच आरोग्याला देखील फायदा होतो. याशिवाय काही ठराविक योगासनं ही पचनसंस्थेच्या फायद्याची ठरतात. योगासनं केल्याने पचनसंस्था मजबूत होऊन खाल्लेलं अन्न लवकर पचायला मदत होते.

प्रतिकात्मक फोटो : गॅसेस, ॲसिडिटीचा त्रास होतोय? करा ‘ही’ योगासने, दूर होतील पोटाचे विकार
प्रतिकात्मक फोटो : गॅसेस, ॲसिडिटीचा त्रास होतोय? करा ‘ही’ योगासने, दूर होतील पोटाचे विकार
मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे, असंतुलित आहार आणि जंकफूडमुळे गॅसेस, अपचन आणि पोटफुगीच्या समस्यांचा त्रास सामान्य झाला आहे. या  समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी अनेक जण अनेक पर्यांयांचा, औषधांचा वापर करतात. मात्र तुम्हाला कल्पनाही नसेल की, गॅसेस, ॲसिडिटीच्या त्रासावर योगासनं ही फायदेशीर ठरू शकतात. तुमचा ऐकून विश्वास बसणार नाही मात्र हे खरं आहे. काही ठराविक योगासनं केल्याने अपचन आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांवर मात करता येते.
अपचानाच्या समस्येवर कोणती योगासने फायद्याची आहेत, हे जाणून घेण्यापूर्वी अपचनाचं मूळ कशात आहे ते समजून घेऊयात.
अपचनाचा त्रास का होतो ?
अपचनाच्या त्रासासाठी सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे जंक फूड आणि वेळी-अवेळी खाणं. आपण जे पौष्टिक अन्न खातो त्यात प्रथिनं, फायबर्स आणि खनीजं असतात. त्यामुळे असं अन्न लवकर पचलं जातं. मात्र फास्टफूड किंवा जंकफूडमध्ये पोषकतत्त्वे नसतात, त्यामुळे ते अन्न पचायला जड जातं. असं अन्न पूर्णपणे न पचल्यामुळे अपचनाचा त्रास होऊन वजनही वाढू शकतं.
advertisement
आता जाणून घेऊयात अपचानाच्या त्रासावर योगासने कशी फायद्याची ठरतात ती.
योगासने केल्याने फक्त शरीरालाच नाही तर मानसिकच आरोग्याला देखील फायदा होतो. याशिवाय काही ठराविक योगासनं ही पचनसंस्थेच्या फायद्याची ठरतात. नियमितपणे योगासनं केल्याने पचनसंस्था मजबूत होऊन खाल्लेलं अन्न लवकर पचायला मदत होते.
advertisement
जाणून घेऊयात अपचन आणि गॅसेसच्या समस्येवर कोणती योगासनं फायद्याची आहेत ती.

अपनासन

Yoga for digestion: गॅसेस, ॲसिडिटीचा त्रास होतोय? करा ‘ही’ योगासने, दूर होतील पोटाचे विकार
या आसनामुळे  पोटाचे स्नायू ताणले जातात. ज्यामुळे गॅसेस आणि पोटफुगीच्या समस्येपासून आराम मिळू शकतो. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही पाठीवर झोपा.  तुमचे गुडघे जवळ घ्या. मग त्यांना तुमच्या छातीजवळ आणा. दोन्ही गुडघे दोन्ही हातांनी गुडघे घट्ट धरून ठेवा. यामुळे तुमच्या पोटावर दाब येईल. शक्य तितका वेळ या स्थितीत राहा. यानंतर तुमच्या पूर्वस्थितीत परत या.
advertisement

उत्कटासन

Yoga for digestion: गॅसेस, ॲसिडिटीचा त्रास होतोय? करा ‘ही’ योगासने, दूर होतील पोटाचे विकार
या आसनामुळे पोटावर दाब पडून पचन सुधारायला मदत होते. हे आसन केल्यामुळे पोटाभोवती जमलेली चरबी सुद्धा कमी व्हायला मदत होते. ज्यामुळे गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो. हे आसन करण्यासाठी, आधी सरळ उभे राहा. हात वर करा. मग तुमचे पाय थोडे बाजूला करा. हळूहळू तुम्ही गुडघ्यापर्यंत शरीर वाकवा. यामुळे तुमच्या पोटावर पर्यायाने पचनसंस्थेवर दाब येऊन पचन सुधारायला मदत होईल.
advertisement

पश्चिमोत्तानासन

Yoga for digestion: गॅसेस, ॲसिडिटीचा त्रास होतोय? करा ‘ही’ योगासने, दूर होतील पोटाचे विकार
अंगदुखीवर पश्चिमोत्तानास जितकं फायद्याचं आहे, तितकच ते पचनसंस्थेसाठी देखील फायद्याचं आहे. हे आसन केल्यामुले पाठीचा कणा आणि खांदे ताणले जातात. ज्यामुळे अंगदुखीच्या समस्यापासून आराम मिळू शकतो. याशिवाय पोटवरही दाब आल्याने पचन सुधारायला मदत होते. पश्चिमोत्तानासन हे दिसायला जरी सोपं दिसत असलं तरीही ते पूर्णपणे करणं थोडं कठीण आहे. मात्र नियमित सरावाने तुम्ही हे आसन उत्तम प्रकारे करू शकता. हे आसन करण्यासाठी तुम्ही पाय पसरून जमिनीवर बसा. तुमचा पाठीचा कणा सरळ ठेवा आणि तुमच्या पायांच्या दिशेने झुका. तुमचं डोकं गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करा. मात्र हे करताना तुमचे पाय दुमडू नका.
advertisement

बालासन

Yoga for digestion: गॅसेस, ॲसिडिटीचा त्रास होतोय? करा ‘ही’ योगासने, दूर होतील पोटाचे विकार
बालासनामुळे रक्ताभिसरण वाढतं ज्यामुळे पचनसंस्था सक्रिय राहते. बालासन करण्यासाठी तुमच्या टाचांवर बसा, दोन्ही हात पुढे करा आणि तुमचं कपाळ जमिनीला टेकवा. हे आसन करताना तुमच्या संपूर्ण शरीराचे स्नायू ताणले जातात.
advertisement
जर तुम्हाला गॅस, अपचन आणि पोटफुगीच्या समस्येने त्रास होत असेल तर ही 4 योगासनं तुमच्या फायद्याची ठरू शकतील. नियमितपणे ही योगासनं केल्याने तुमची पचनसंस्था मजबूत होऊन तुम्हाला असलेले त्रास मुळापासून नष्ट व्हायला मदत होऊ शकते. मात्र जर तुम्हाला कोणते गंभीर आजार किंवा आरोग्याशी संबंधित काही समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ल्यानंतरच ही योगासने करा.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Yoga for digestion: गॅसेस, ॲसिडिटीचा त्रास होतोय? करा ‘ही’योगासने, दूर होतील पोटाचे विकार
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement