Best Yoga for Winter: हिवाळ्यात आजारी पडायचं नाहीये, मग करा ‘ही’ योगासनं राहाल फिट

Last Updated:

Special yoga for winter: योगासनांमुळे शरीर आतून उबदार राहायला मदत होते. याशिवाय स्नायूंची लवचिकता टिकून सांधेदुखीचा त्रास ही कमी होतो. त्यामुळे हिवाळ्यात योगासने केल्याने जास्त थंडी वाजत नाही.

प्रतिकात्मक फोटो : हिवाळ्यात आजारी पडायचं नाहीये, मग करा ‘ही’ योगासनं राहाल फिट
प्रतिकात्मक फोटो : हिवाळ्यात आजारी पडायचं नाहीये, मग करा ‘ही’ योगासनं राहाल फिट
मुंबई: सध्या थंडीचा कडाका प्रचंड वाढलाय. अनेक जण या थंडीचा आनंद घेत आहेत तर काही आजारी पडू लागले आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेकांनी घरात राहणं पसंत केलंय. बाहेर पडताना स्वेटर, शाल, रजई अशा एका ना अनेक गोष्टी घेऊन लोकं बाहेर पडत आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला योगासनांचे काही साधे आणि सोपे व्यायाम सांगणार आहोत ज्यामुळे हिवाळ्यात तुमचं शरीर आतून उबदार राहायला मदत होईल. या योगासनांमुळे स्नायूंची लवचिकता टिकून सांधेदुखीचा त्रास कमी होईल. याशिवाय, नियमितपणे योगासमे केल्याने मन आणि मेंदू ताजंतवानं आणि शांत राहायला मदत होते. ज्यामुळे दिवसभर तुम्ही प्रफुल्लित राहू शकता.

जाणून घेऊयात हिवाळ्यासाठी फायदेशीर योगासने आणि त्यांचे फायदे काय आहेत

हस्त उत्तानासन (Raised Arms Pose)

Best Yoga for Winter: हिवाळ्यात आजारी पडायचं नाहीये, मग करा ‘ही’ योगासनं राहाल फिट
हे आसन केल्याने शरीर उबदार राहायला मदत तर होतेच मात्र यासोबत मणक्यासाठी हे आसन फार फायद्याचं आहे. यामुळे मणक्याला लवचिकता येते. प्रणामासनाच्या मुद्रेत उभं राहून हात डोक्याच्या वर न्या. डोकं, मान आणि पाठीचा वरचा भाग शक्य होईल तितका मागे न्या. थोडा वेळ त्याच स्थितीत हा मग पुन्हा मुळ स्थितीत परत या. असं 5 ते 6 वेळा करा.
advertisement

पदहस्तासन (Standing Forward Bend Pose)

Best Yoga for Winter: हिवाळ्यात आजारी पडायचं नाहीये, मग करा ‘ही’ योगासनं राहाल फिट
या आसनामुळे पूर्ण शरीर सक्रिय होऊन रक्ताभिसरण क्रिया सुधारतं. हे आसान करण्यासाठी हस्त उत्तानासनाच्या स्थितीत या. शरीर मागे नेण्याऐवजी पुढच्या बाजूला वाकवा. नाक गुडघ्याजवळ आणण्याचा प्रयत्न करा. हात पायाजवळ जमिनीवर ठेवा. हे आसन थोडं कठीण आहे. हे आसन करताना सुरुवातीला तुम्ही तुमचे गुडघे वाकवू शकता. हळूहळू तुमचे गुडघे सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा.
advertisement

उष्ट्रासन (Camel Pose)

Best Yoga for Winter: हिवाळ्यात आजारी पडायचं नाहीये, मग करा ‘ही’ योगासनं राहाल फिट
या आसनामुळे छाती मोकळी व्हायला मदत होते. या आसानात पूर्ण शरीराची हालचाल होत असल्याने हे आसन केल्याने शरीर उबदार राहायाला मदत होते. हे आसन करताना गुडघ्यांवर बसा. मागच्या बाजूला झुकून हात आपल्या नितंबांवर ठेवा. मग आणखी मागे झुकून हात पायांवर ठेवा. या स्थितीत काही श्वास घ्या आणि नंतर हळूहळू पूर्वस्थितीत या.
advertisement

हलासन (Plough Pose)

Best Yoga for Winter: हिवाळ्यात आजारी पडायचं नाहीये, मग करा ‘ही’ योगासनं राहाल फिट
या आसनामुळे फक्त शरीराला उर्जाच मिळत नाही तर मनही शांत व्हायला मदत होते. हे आसन करताना पाठीवर झोपा आणि पाय 90 अंशांपर्यंत वर उचलून हळूहळू डोक्याच्या मागे नेण्याचा प्रयत्न करा. पायाच्या बोटांनी जमिनीला स्पर्श करा. थोडावेळ या स्थितीत रहा. नंतर हळूहळू पूर्वस्थितीत परत या.
advertisement

भुजंगासन (Cobra Pose)

Best Yoga for Winter: हिवाळ्यात आजारी पडायचं नाहीये, मग करा ‘ही’ योगासनं राहाल फिट
हे आसन शरीराला उबदार ठेवते आणि पाठ मजबूत करते. सर्वप्रथम, पोटावर झोपा आणि तळवे खांद्याच्या खाली आणि आणि हळू हळू तुमचं शरीर वर उचलण्याचा प्रयत्न करा.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Best Yoga for Winter: हिवाळ्यात आजारी पडायचं नाहीये, मग करा ‘ही’ योगासनं राहाल फिट
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement