तुम्हाला जास्त थंडी वाजतेय; कारणीभूत आहेत ‘हे’ आजार, दुर्लक्ष करणं पडेल महागात
- Published by:Tushar Shete
Last Updated:
तुम्हाला गुलाबी थंडी ही बोचरी थंडी वाटत असेल किंवा बाकीच्यांपेक्षा तुम्हाला जास्त थंडी वाजत असेल तर तुम्हाला आहारात बदल करण्याची गरज आहे असा सल्ला डॉक्टर देतात.
Winter Health Tips: हिवाळ्याला सुरूवात झालीये. काही दिवसांपासून वातावरणात पडत असलेल्या गारव्यामुळे गुलाबी थंडीचा अनुभव अनेकजण घेत आहेत. मात्र काही जणांना ही थंडी गुलाबी तर बोचरी थंडी वाटू लागली आहे. काही जण तर आजारी देखील पडू लागले आहे. मात्र तुम्ही कधी विचार केलाय का ? वातावरण बदलल्यानंतर काही जणांना सर्दी खोकला होतो तर काही जणांना ताप येतो. अनेकांना थंडी सहन होते तर काही जणांना गार वाराही नकोसा वाटतो. या मागचं कारण काय असू शकतं. ‘व्यक्ती तितक्या प्रवृत्ती’ या म्हणीला थोडंसं बदलून ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मात्र तुम्हाला गुलाबी थंडी, ही बोचरी थंडी वाटत असेल किंवा अन्य लोकांपेक्षा तुम्हाला जास्त थंडी वाजत असेल तर तुमच्यासाठी ते धोक्याचं ठरू शकतं. तुम्ही डॉक्टरांकडून जाऊन त्वरित तपासणी करून घेण्याची गरज आहे, कारण तुम्हाला खालीलपैकी काही आजार असू शकतात.
डायबिटीस:
डायबिटीसमुळे व्यक्तीच्या रक्ताभिसरणावर परिणाम होतो. त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींना जास्त थंडी जाणवते. शरीरात रक्ताभिसरण व्यवस्थित न झाल्याने धमन्या अरूंद होतात आणि त्यामुळे रक्त प्रवाहाला अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला इतरांपेक्षा जास्त थंडी वाजू शकते.
लोहाची कमतरता
शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे लाल रक्तपेशींमध्ये घट होतो. यामुळे एखाद्या व्यक्तीला थंडी सहन होऊ शकत नाही आणि इतरांच्या तुलनेत जास्त थंडी वाजते. हिरव्या पालेभाज्या, दूध, फळे, गाजर इत्यादींच्या समावेशाने लोहाची कमतरता भरून काढायला मदत होते.
advertisement
हाइपोथायरॉइड
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हाइपोथायरॉइड हे जास्त थंडी वाजण्याचे कारण असू शकते. जेव्हा थायरॉईड ग्रंथी थायरॉक्सिन हार्मोन तयार करू शकत नाही, किंवा कमी प्रमाणात करतात तेव्हा शारीरिक कार्य विस्कळीत होते आणि त्यामुळे एखाद्या व्यक्तीला प्रमाणापेक्षा जास्त थंडी वाजू शकते.
advertisement
व्हिटॅमिन बी12 ची कमतरता
एखाद्या व्यक्तीच्या शरीरात व्हिटॅमिन बी12 ची कमतरता असेल तर त्यांना इतरांपेक्षा जस्त थंडी वाजू शकते. पुरूषांपेक्षा स्त्रियांमध्ये व्हिटॅमिन बी12ची कमतरता अधिक आढळते. ज्या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन बी12 आहे ते पदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
आहारात करा हे बदल
तुम्हाल वरीलपैकी कोणते आजार असतील आणि त्याची माहिती तुम्हाला असेल किंवा तुम्हाला इतरापेक्षा जास्त थंडी वाजत असेल तर हिवाळ्यात तुम्हाला आहारात काही बदल करावे लागतील. दैनंदिन आहारात सुका मेवा, गूळ, सुंठ, कडधान्ये, दूध, आलं, लसूण, मांसाहार इत्यादींचा समावेश करावा. या व्यतिरिक्त कोमट पाणी, डिटॉक्स पित रहावं. खोबरेल तेल किंवा मॉइश्चरायझर याने शरीराची मालिश करावी, ज्यामुळे तुम्हाला थंडी कमी वाजेल आणि ड्राय स्किन, टाचांच्या भेगांवर आपसूकच उपचार होऊन जातील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 19, 2024 3:34 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
तुम्हाला जास्त थंडी वाजतेय; कारणीभूत आहेत ‘हे’ आजार, दुर्लक्ष करणं पडेल महागात