थंडीत दही खावं की नाही ? आहारतज्ज्ञ काय सांगतात ?

Last Updated:

दही थंड असल्याने उन्हाळ्यात सर्रासपणे दह्याचा वापर होतो. पण हिवाळ्यात दही खावं की नाही असा प्रश्न अनेकांना पडतो.

थंडीत दही खावं की नाही ? आहारतज्ज्ञ काय सांगतात ?
थंडीत दही खावं की नाही ? आहारतज्ज्ञ काय सांगतात ?
मुंबई : अन्नाला पूर्णब्रह्म म्हटलं जातं आणि याच अन्नाला पूर्ण करण्यात दह्याच्या छोट्याशा वाटीचा फार मोठा वाटा आहे. सलाड किंवा दही कोशिंबीर जेवणाची चव वाढवते. दही थंड असल्याने उन्हाळ्यात सर्रासपणे दह्याचा वापर होतो. मग ते ताक असो लस्सी असो वा जेवणासोबत घेतलेलं वाटीभर दही. पण हिवाळ्यात दही खावं की नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. दह्यात असलेल्या प्रोबायोटिक्समुळे पचन चांगलं व्हायला मदत होते. दह्यामध्ये गुड बॅक्टेरिया व्यतिरिक्त कॅल्शियम आणि जीवनसत्वंही आढळून येतात. जाणून घेऊयात दह्याचे फायदे किती आणि कसे आहेत ते.
दह्याचे फायदे
  • दही खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते यामुळे गॅसेस किंवा बद्धकोष्ठता सारख्या आजरांपासून आराम मिळू शकतो.
  • दही खाणं हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे वाईट कोलेस्ट्रॉल कमी होऊन चांगलं कोलेस्ट्रॉल वाढायला मदत होते.
  • शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दही उत्तम नैसर्गिक औषध आहे.
  • दह्यामुळे शरीराला व्हिटॅमिन डी, कॅल्शियम आणि झिंक मिळते जे रोगप्रतिकारक शक्तीसाठी वाढवते.
  • काही जण वजन कमी करण्यासाठीही दही खातात. यातील उच्च प्रथिनांमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते, ज्यामुळे भूक नियंत्रित राहते. ज्यामुळे अतिरिक्त आहार टाळला जातो आणि शरीराचे वजन नियंत्रित राहू शकतं.
  • त्वचा निरोगी ठेवण्यातही दही मदत करतं. दह्यामुळे त्वचेची चमक कायम राहते. यामुळे त्वचेला पुरेसे हायड्रेशनही मिळते.
advertisement
हिवाळ्यात दही खावं की नाही याबद्दल आहारतज्ज्ञ भावेश गुप्ता यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय.
advertisement
भावेश गुप्ता डाएट संदर्भातल्या टिप्स नेहमी शेअर करत राहतात. भावेश म्हणतात की,  ‘लोकांना वाटते दही हे थंड आहे. पण, आयुर्वेदानुसार दह्याचं स्वरूप उबदार असते आणि हिवाळ्यात दही खाल्ल्याने शरीराला अधिक फायदे होतात.दही हे प्रोबायोटिक अन्न आहे जे शरीराला फायदेशीर बॅक्टेरिया प्रदान करते. त्यात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी 12 असते ज्यामुळे ते हिवाळ्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतं.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
थंडीत दही खावं की नाही ? आहारतज्ज्ञ काय सांगतात ?
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement