हिवाळ्यात आजारी पडायचं नाहीये मग खा ‘या’ गोष्टी, शरीर राहील उबदार, वाढेल रोगप्रतिकारक शक्ती
- Published by:Tushar Shete
Last Updated:
‘जैसा देस वैसा भेस’ या म्हणीप्रमाणे जर तुम्हाला कोणत्याही ऋतूत एकदम फिट राहायचं असेल तर तुम्हाला तसा आहार घ्यायला हवा.
मुंबई : ऋतूचक्रात बदल झाला की, सर्दी, खोकला, थंडी ताप अशा आजारांना सुरूवात होते. थंडीमुळे बदलत्या वातावरणाशी जुळवून घेताना ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते अशा व्यक्ती आजारी पडू शकतात. ‘जैसा देस वैसा भेस’ या म्हणीप्रमाणे जर तुम्हाला कोणत्याही ऋतूत एकदम फिट राहायचं असेल तर तुम्हाला तसा आहार घ्यायला हवा. ऋतू कोणताही असो, आहार पौष्टिकतेने परिपूर्ण असेल तर निरोगी आणि तंदुरुस्त राहता येते. मात्र ऋतूचे तापमान लक्षात घेऊन गरम किंवा थंड गोष्टींचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. थंडीच्या दिवसात आहारात गरमवृत्तीच्या पदार्थांचा समावेश केल्याने ते शरीर आतून उबदार ठेवण्यास मदत करतीलच त्याचबरोबर पोषक तत्वांनी समृद्ध असल्याने प्रतिकारशक्ती वाढवण्यास देखील उपयुक्त ठरू शकतील. चला तर मग जाणून घेऊया असे कोणते पदार्थ आहेत जे तुम्हाला हिवाळ्यात आपल्या शरीरासाठी फायद्याचे ठरतील.

हिरव्या पालेभाज्या
मेथी, चवळी आणि मोहरीच्या हिरव्या पानाची भाजी यांचा हिवाळ्यात खायला सुरूवात करा. या सेवनाने शरीराला आतून उष्णता मिळते आणि पोषणमूल्य वाढून रोगप्रतिकारशक्ती वाढते. हिरव्या भाज्यांमध्ये तेलमसाल्यांचा फारसा वापर होत नाही, त्यामुळे फिटनेसच्या दृष्टीनेही फायदेशीर आहे.

advertisement
साखरेऐवजी वापरा गुळ
शरीर आतून उबदार ठेवण्यासाठी तुमच्या आहारात साखरेऐवजी गुळाचा समावेश करा. रोज थोडासा गूळ खाल्ल्यास सर्दी-खोकल्यापासून बचाव होतो, तसेच पचनक्रियेला फायदा होतो आणि शरीरात नवीन रक्त तयार व्हायला मदत होते. यात व्हिटॅमिन सी देखील थोड्या प्रमाणात असतात जे रोगप्रतिकार शक्ती वाढवते.

advertisement
संक्रातीच्या आधीच वापरा तिळ
थंडीच्या शरीर उबदार राहण्यासाठी तिळ खूप फायद्याचे आहेत. अनेक जण त्यांच्या आहारात तिळाचा वापर करतात. काहीजण तर संक्राती आधीच लाडू बनवून त्याचे रोज सेवन करतात. तिळ शरीरासाठी खूप फायदेशीर देखील आहे. तुम्ही तीळ भाजून खाता येऊ शकता. तिळ हा कॅल्शियम आणि प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. मात्र ज्यांना युरिक ॲसिडचा त्रास आहे त्यांनी तीळ भाजण्याऐवजी भिजवून खावेत.
advertisement

सुका मेवा
हिवाळ्यात बदाम आणि अंजीर या सुकामेव्यांचा उपयोग करणं केव्हाही फायद्याचं ठरू शकतं. यात मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असून त्यांचा प्रभावही उष्ण असतो. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढेल आणि शरीराला आतून उष्णता मिळेल. याशिवाय स्नायूंच्या दुखण्यापासून आराम मिळण्यासोबतच वजनही नियंत्रणात राहील.

advertisement
अळशीच्या बिया
थंडीच्या दिवसात तुमच्या आहारात अळशीच्या बियांचा समावेश करा. तुम्ही दररोज अर्धा किंवा एक चमचा भाजलेल्या बियांचं सेवन करा किंवा तुम्हाला आवडत असल्यास या बियांचे लाडूमध्ये समावेश करून रोज एक लाडू खाऊ शकता. याचे गरोदर महिलांनी सेवन करणे टाळावं
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 18, 2024 7:08 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
हिवाळ्यात आजारी पडायचं नाहीये मग खा ‘या’ गोष्टी, शरीर राहील उबदार, वाढेल रोगप्रतिकारक शक्ती