TRENDING:

Hair Care : केसांच्या चांगल्या पोषणासाठी या तेलांचे पर्याय लक्षात ठेवा, केस दिसतील चमकदार

Last Updated:

जड आणि चिकट केसांच्या तेलांना कंटाळला असाल आणि तुमच्या केसांना पोषण देणारं आणि हलकं वाटणारं असं तेल शोधत असाल तर ही माहिती नक्की वाचा. अ‍ॅव्होकाडो तेल, जोजोबा तेल, बदामाचं तेल यासारखे काही पर्याय चांगले ठरतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

नारळ किंवा एरंडेल तेल, जड वाटू शकतात. या तेलांमुळे केस खूप चिकट होतात. तर काही तेलं खूप लवकर शोषली जातात. केसांच्या मुळांमधे खोलवर जातात, त्यांना पोषण देतात, पण पृष्ठभागावर चिकट थर येत नाही.

पाहूयात यातले काही पर्याय -

बदाम तेल - बदाम तेल हलकं असतं आणि त्यात व्हिटॅमिन ई भरपूर असतं. केस मजबूत करण्यासाठी आणि तुटण्यापासून रोखण्यासाठी हे तेल उपयुक्त आहे. केसांच्या टोकांना थोड्या प्रमाणात लावल्यानं ते त्वरित चमकदार आणि मऊ होतात.

advertisement

Bloating : पोटफुगीला वैतागलात ? हे सात पदार्थ देतील पोटफुगीपासून आराम

जोजोबा तेल -  हे तेल टाळूत सहज शोषलं जातं. यामुळे केसांची छिद्र बंद होत नाहीत आणि केसांना हलकं वाटतं, ज्यामुळे केस चांगले दिसतात.

आर्गन ऑईल - आर्गन ऑईल लिक्विड गोल्ड म्हणूनही ओळखलं जातं. या तेलात व्हिटॅमिन ई आणि फॅटी एसिड असतात. हे तेल हलकं आहे, यामुळे केस लगेच मॉइश्चरायझ होतात, या तेलामुळे केसांचा कुरळेपणा कमी होतो आणि केसांना चमक येते. तेलकट टाळूंसाठी देखील हे तेल एक उत्तम पर्याय आहे.

advertisement

द्राक्षाच्या बियांचं तेल - हे उपलब्ध असलेल्या सर्वात हलक्या तेलांपैकी एक आहे. ते जवळजवळ पाण्यासारखं वाटतं. त्याला गंध नसतो. यात अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. केस खूप पातळ असतील आणि तुम्हाला तेलकटपणा नको असेल तर हे तेल तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे.

Skin Care : घरीच मिळवा कोरियन ग्लास स्किन, चेहरा येईल उजळून, तांदळाच्या पीठाचा करा असा वापर

advertisement

अ‍ॅव्होकाडो तेल - हे थोडे जाड वाटू शकतं, परंतु त्यात ओलिक अ‍ॅसिड भरपूर असतं, यामुळे तेल केसांत लवकर शोषण्यास मदत होते. कोरड्या आणि खराब झालेल्या केसांसाठी हे तेल उत्तम आहे, कारण ते केसांना खोलवर कंडिशनिंग करतंं आणि तुटण्यापासून रोखतं, तरीही केसांना जड वाटत नाही.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
450 झाडांची केली लागवड, सीताफळ शेतीतून लाखात कमाई, कसा केला यशस्वी प्रयोग?
सर्व पहा

हलक्या वजनाची तेलं कमी प्रमाणात वापरल्यास सर्वोत्तम परिणाम देतात. यासाठी, तळहातावर तीन-चार थेंब घ्या, हातांवर घासून घ्या आणि नंतर ते केसांवर आणि टाळूवर हलक्या हातानं मसाज करा. रात्रभर तसंच ठेवू शकता किंवा शॅम्पू करण्यापूर्वी एक तास आधी लावू शकता.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Hair Care : केसांच्या चांगल्या पोषणासाठी या तेलांचे पर्याय लक्षात ठेवा, केस दिसतील चमकदार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल