Skin Care : घरीच मिळवा कोरियन ग्लास स्किन, चेहरा येईल उजळून, तांदळाच्या पीठाचा करा असा वापर
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
त्वचा चमकदार दिसण्यासाठी, घरी अगदी सोप्या गोष्टी वापरल्या जाऊ शकतात, ज्यामुळे त्वचेला नैसर्गिकरित्या ताजेपणा आणि चमक मिळेल. यासाठी जाणून घेऊया, एका पर्यायाबद्दल. यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ होईल आणि त्वचेवर नैसर्गिक चमक येईल.
मुंबई : आजकाल, सोशल मीडियावर कोरियन स्किनकेअर ट्रेंड खूप पाहायला मिळत आहेत आणि प्रत्येकाला त्यांच्यासारखी चमकदार त्वचा हवी आहे, पण यासाठी महागडी उत्पादनं, पार्लर ट्रीटमेंट किंवा केमिकल क्रीम वापरण्याची गरज नाही.
त्वचा चमकदार दिसण्यासाठी, घरी अगदी सोप्या गोष्टी वापरल्या जाऊ शकतात, ज्यामुळे त्वचेला नैसर्गिकरित्या ताजेपणा आणि चमक मिळेल. यासाठी जाणून घेऊया, एका पर्यायाबद्दल. यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ होईल आणि त्वचेवर नैसर्गिक चमक येईल.
या फेशियलसाठी लागणारं साहित्य घरी सहज उपलब्ध आहे. हे फेशियल तयार करण्यासाठी तुम्हाला दोन चमचे तांदळाचं पीठ, एक चमचा कोरफडीचं जेल आणि एक चमचा गुलाबजल आवश्यक आहे. तांदळाच्या पिठामधे त्वचेवरची धूळ आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्याची क्षमता असते. कोरफड जेलमुळे त्वचा शांत राहते आणि मॉइश्चरायझ होते. गुलाबपाण्यामुळे हे मिश्रण मऊ होतं, ज्यामुळे त्वचा मऊ आणि सुगंधित होते.
advertisement
स्क्रबिंगनं सुरुवात करा - कोमट पाण्यानं चेहरा धुतल्यानंतर, एक चमचा तांदळाचं पीठ आणि कोरफडीचा गरमिसळा आणि हलक्या हातानं मालिश करा. हे नैसर्गिक स्क्रब मृत त्वचेच्या पेशी काढून टाकते, यामुळे त्वचेवर साचलेलं तेल आणि अस्वच्छ छिद्रं साफ करणं सोपं जातं. नियमित स्क्रबिंगमुळे ब्लॅकहेड्स आणि टॅनिंग कमी होण्यास मदत होते.
advertisement
फेस पॅक लावा - स्क्रब केल्यानंतर, उरलेलं मिश्रण गुलाबपाण्यात मिसळून एक गुळगुळीत पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर समान रीतीनं लावा. पंधरा - वीस मिनिटं तसंच राहू द्या आणि नंतर थंड पाण्यानं धुवा. या फेसपॅकमुळे त्वचेला पोषण मिळतं, तेलकटपणा कमी होतो आणि यामुळे चेहऱ्यावर चमक येते.
ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मॉइश्चरायझिंग - फेसपॅक काढल्यानंतर, त्वचा थोडी कोरडी वाटू शकते. म्हणून, थोडं मॉइश्चरायझर किंवा थोडासा कोरफडीचा गर पुन्हा लावणं महत्वाचं आहे. यामुळे त्वचा हायड्रेटेड राहील, कोरडेपणा टाळता येईल आणि दिवसभर तुमचा चेहरा मऊ आणि चमकदार राहील.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 24, 2025 11:36 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care : घरीच मिळवा कोरियन ग्लास स्किन, चेहरा येईल उजळून, तांदळाच्या पीठाचा करा असा वापर


