घराच्या सजावटीसाठी अनेक जण वेगवेगळ्या प्रकारची रोपं लावतात. कारण यामुळे घर आणि परिसरात सकारात्मक ऊर्जा राहते. रोपं निरोगी आणि हिरवीगार राहण्यासाठी काही उपाय गरजेचे असतात. हे उपाय सहजसोपे असून, ते केल्यास तुमची परसबाग कायम हिरवीगार राहते.
आजारांशी दोन हात करतं लाल-पिवळ फळ, पावसात खाल तर ताकदवर व्हाल
advertisement
जेव्हा कोणत्याही कारणामुळे रोपांची पानं सुकतात, तेव्हा ती लगेच कापून टाकावी. कारण ही पानं रोपातले पोषक घटक घेतात. त्यामुळे रोपांवरची इतर पानं सुकू लागतात. त्यामुळे सुकलेली पानं तातडीनं काढली तर रोप हिरवंगार राहतं.
रोप सुकलं असेल तर त्याला पाणी देणं गरजेचं असतं. त्यामुळे रोपांना नियमित पाणी घालावं. जसं माणसाला पाण्याची सतत गरज असते, तसंच रोपांनादेखील सातत्यानं पाणी देणं आवश्यक आहे; पण रोपांना प्रमाणापेक्षा जास्त पाणी देणं टाळा, अन्यथा त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
रोपं हिरवीगार राहावीत, यासाठी दर्जेदार मातीचा वापर गरजेचा आहे. यासाठी मोठ्या झाडांखालची माती रोपांना द्यावी. रोपवाटिकेतून खत आणून ते रोपांना घालावं. यामुळे रोपांना नवसंजीवनी मिळेल. रोपं दीर्घ काळ टिकतील आणि हिरवीगार राहतील. यामुळे साहजिकच घराचं सौंदर्य तर खुलेलच. त्यासोबत सकारात्मकतादेखील वाढेल.