TRENDING:

Kamal Mudra : कमळ मुद्रेनं होते अस्वस्थता कमी, पाहूया कमळ मुद्रा कशी करायची आणि या आसनाचे आणखी फायदे

Last Updated:

शारीरिक आणि मानसिक थकव्यावर एक चांगला उपाय म्हणजे योगासनं. योगामुळे आयुष्य संतुलित व्हायला मदत होते. काही योगासनांचा खोलवर परिणाम होतो. यापैकी एक म्हणजे सुखासनातील पद्म मुद्रा, ज्याला कमळ मुद्रा असंही म्हणतात. या मुद्रेमुळे शरीराला स्थैर्य मिळतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : प्रत्येकाची दिनचर्या वेगळी असते, त्यात व्यायाम करायला, शांत बसायला वेळ मिळतोच असं नाही. शरीराबरोबरच मनही थकतं.
News18
News18
advertisement

शारीरिक आणि मानसिक थकव्यावर एक चांगला उपाय म्हणजे योगासनं. योगामुळे आयुष्य संतुलित व्हायला मदत होते. काही योगासनांचा खोलवर परिणाम होतो. यापैकी एक म्हणजे सुखासनातील पद्म मुद्रा, ज्याला कमळ मुद्रा असंही म्हणतात. या मुद्रेमुळे शरीराला स्थैर्य मिळतं.

No Spend Challenge : नो स्पेंड चॅलेंज म्हणजे काय ? नवीन वर्षातला नवा ट्रेंड

advertisement

पद्म मुद्रा. संस्कृतमधे पद्म म्हणजे कमळ. जेव्हा हे आसन सुखासनात बसून केलं जातं तेव्हा शरीर नैसर्गिकरित्या स्थिर राहतं आणि अंतर्मुख व्हायाला मदत होते. सुखासनात पद्ममुद्रा केल्यानं शरीरात ऊर्जेचा संचार वाढतो. हे आसन हृदयचक्रांशी थेट जोडल्याचं मानलं जातं. भावनिक ताण, भीती किंवा नकारात्मक विचारांशी झुंजणाऱ्यांना या आसनाचा फायदा होऊ शकतो.

नियमित सरावानं भावनिक संतुलन सुधारायला मदत होते आणि मनावरचा ताण दूर व्हायला मदत होते.

advertisement

मानसिक आरोग्यासाठी सुखासन म्हणजेच कमळ आसनही प्रभावी मानलं जातं. या आसनामुळे खोल आणि शांत श्वास घेण्यास मदत होते, ज्यामुळे मज्जासंस्था शांत होते.

Menopause : रजोनिवृत्ती आणि मेंदूचं आरोग्य, जाणून घेऊया मेंदूवर होणारे परिणाम

या आसनामुळे ताण आणि चिंतेच्या काळात मन शांत होण्यास मदत होते. या सरावामुळे नैराश्य आणि चिंता यासारख्या समस्या हळूहळू कमी होतात. पद्म मुद्रा करताना, शरीर पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्था सक्रिय करते, ज्यामुळे पचन सुधारतं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
भाविकांसाठी सेवा, पोस्टाकडून गंगाजल आणि महाप्रसाद मिळणार घरपोच, ऑर्डर कशी कराल?
सर्व पहा

ज्यांना आम्लपित्त, अपचन किंवा पोटाच्या समस्या आहेत त्यांना या आसनाच्या नियमित सरावानं आराम मिळू शकतो. हे आसन शरीरातील ऑक्सिजन प्रवाह संतुलित करतं, थकवा कमी करतं आणि उर्जेची पातळी सुधारतं. पद्ममुद्रेचा नियमित सराव केल्यानं मन शांत होतंच, शिवाय विचार हळूहळू सकारात्मक आणि आयुष्य संतुलित होण्यास मदत होते.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kamal Mudra : कमळ मुद्रेनं होते अस्वस्थता कमी, पाहूया कमळ मुद्रा कशी करायची आणि या आसनाचे आणखी फायदे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल