डोळे थंड पाण्याने धुवा
डोळ्यांची जळजळ कमी करण्यासाठी आणि डोळ्यांच्या स्नायूंवरील तणाव दूर करण्यासाठी डोळे दिवसातून अनेक वेळा थंड पाण्याने डोळे धुणे हा सर्वात सोपा मार्ग आहे. यामुळे तुमच्या डोळ्यांना आराम मिळेल आणि तुम्हाला आराम मिळेल. तुम्ही एक स्वच्छ कापड थंड पाण्यात बुडवून तुमच्या डोळ्यांवर ठेवू शकता.
advertisement
'ऐकावं ते नवलंच ! योगासनांमुळे होईल सौंदर्यात वाढ; त्वचेला मिळेल नैसर्गिक चमक, समस्या होतील नाहीशा'
टी बॅग्सचा वापर
प्रवासात चहा किंवा कॉफी पिण्यासाठी सहज उपयोगी पडणारी टी बॅग तुम्हाला डोळ्यांपासून आराम देऊ शकते.
ग्रीन टी किंवा कॅमोमाइल टी बॅग थोडावेळ फ्रीजमध्ये ठेवा. यानंतर ती 10-15 मिनिटे डोळ्यांवर ठेवू शकता. यात असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म डोळ्यांची जळजळ कमी करण्यास मदत करतात.
'घरबसल्या वजन कमी करायचं आहे ? ‘या’ पद्धतीने प्या जिरं पाणी आणि फरक पाहा'
गुलाब पाण्याचा वापर
गुलाब पाणी हे थंड असतं.डोळ्यांवर गुलाबपाणी लावल्याने जळजळ आणि सूज कमी होते. जेव्हा जेव्हा डोळ्यांना जळजळ होते, तेव्हा तुम्ही थोडा कापूस घ्या आणि गुलाब पाण्यात बुडवून डोळ्यांवर लावा. तुमचे डोळे शांत होतील.
काकडीचा वापर
डोळ्यांच्या जळजळीवर तुम्हाला सर्वोत्तम उपाय हवा असेल तर एक काकडी दहा मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर काकडीचे गोल तुकडे करा आणि ते तुकडे 10 मिनिटे डोळ्यांवर ठेऊन डोळे बंद करून झोपा. तुम्ही त्याचा रस काढून कापसात बुडवून डोळ्यांना लावू शकता.
या उपाययोजनांमुळे तुम्हाला आरामही मिळेल आणि कोणतीही हानी होणार नाही. या व्यतिरिक्त जर तुम्हाला डोळ्यांना दुसरा कोणता त्रास असेल किंवा हे साधे उपाय करूनही तुम्हाला आराम वाटत नसेल तर तुमच्या डोळ्यांच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.