निनाद गिडवानी यांनी सांगितलं की, त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि त्यानंतर अनेक गोष्टींवर संशोधन करण्याचा प्रवास सुरू झाला. त्यांनी आत्तापर्यंत विविध क्षेत्रांत संशोधन केले आहे. त्यासाठी त्यांना भारत सरकारकडून अनेक पुरस्कार आणि गोल्ड मेडल मिळाले आहेत. त्यांनी तयार केलेल्या विनाशिट्टीच्या मातीच्या कुकरला विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून सुवर्णपदक मिळाले आहे. या कुकरमध्ये अन्न शिजवल्यास त्यातील सर्व पोषक घटक टिकून राहतात आणि आपल्याला त्या पदार्थातील सर्व पोषक तत्व मिळतात, असं त्यांनी सांगितलं. ही भांडी https://www.ninadspottery.com/ या वेबसाईटवरून घेता येतात.
advertisement
पुणे-मुंबईचा नाद सोडला अन् थेट गाव गाठलं, अर्ध्या एकरात लावलं हे पिक, 3 महिन्यात लखपती, Video
पाच प्रकारच्या मातीचा वापर करून कुकर
नॅचरल प्रेशर कुकर हा पारंपरिक प्रेशर कुकरला चांगला पर्याय असल्याचं निनाद यांनी सांगितलं. पारंपरिक कुकरमध्ये अन्न खूप जास्त दाबाखाली शिजते. कधी शिट्टी नीट न झाल्यास कुकर फुटण्याचा धोका असतो. तसेच अन्नातील चव व पोषणमूल्ये कमी होतात. मात्र, नॅचरल प्रेशर कुकर जो मातीपासून बनवला आहे. यामध्ये फक्त आवश्यक तेवढाच दाब तयार होतो, असे निनाद सांगतात.
झाकणाच्या खास कोनाकार रचनेमुळे कुकरमधील जास्तीची वाफ आपोआप बाहेर जाते. त्यामुळे कुकरमध्ये जास्त दाब साचत नाही आणि अन्न सुरक्षितपणे शिजते. अन्नाची चव, सुगंध आणि पोषणमूल्ये टिकून राहतात. विशेष म्हणजे 100 वर्ष या कुकरला गॅसवर वापरल्यास कोणत्याही प्रकारचा तडा जाणार नाही. यामध्ये 5 प्रकारच्या मातीचा वापर केला आहे. यामध्ये मॅग्नेशियम, झिंक, कॅल्शियम याचा देखील लेप देण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.
काय फायदे आहेत?
मातीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक केल्यास अन्न अधिक चवदार, पौष्टिक आणि आरोग्यदायी होते. या भांड्यांमुळे अन्नातील नैसर्गिक चव आणि पोषणमूल्य टिकून राहत तसेच कोणतीही रासायनिक भेसळ होत नसल्याने अन्न पूर्णपणे सुरक्षित राहते. धातूच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक आरोग्यास हानिकारक आहे. अन्नात हानिकारक घटक मिसळतात, चव कमी होते, पोषणमूल्य कमी होते आणि गॅस जास्त लागतो. त्यामुळे मातीच्या भांड्यांचा वापर करणं आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचं निनाद यांनी सांगितलं.





