TRENDING:

Quick Breakfast Recipe : डाळ न भिजवता 10 मिनिटांत बनवा क्रिस्पी मेंदू वडा! पाहा झटपट आणि सोपी रेसिपी

Last Updated:

Quick and easy medu wada recipe in marathi : नाश्त्यात काय बनवावं सुचत नसेल आणि वेळही कमी असेल तर तुम्ही हा झापतपात बनणारा मेंदू वाद बनवू शकता. विशेष म्हणजे तुम्हाला यासाठो डाळ भिजवण्याचीही गरज नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : बऱ्याचदा आपल्याला नाश्त्यामध्ये काय करावं सुचत नाही. त्यात घाईही असते आणि मुलांना रोज पोहे, उपमा खायला आवडत नाही. त्यांना सतत काहीतरी वेगळं आणि टेस्टी खायचा असतं. अशावेळी लवकर कोणता पदार्थ होईल याची आपण शोधाशोध करतो. आज आम्ही तुमच्या या प्रश्नाचे उत्तर घेऊन आलो आहोत. एक अत्यंत सोपी आणि झटपट बनणारी रेसिपी.
सोपी मेदू वडा रेसिपी
सोपी मेदू वडा रेसिपी
advertisement

नाश्त्यात काय बनवावं सुचत नसेल आणि वेळही कमी असेल तर तुम्ही हा झापतपात बनणारा मेंदू वाद बनवू शकता. विशेष म्हणजे तुम्हाला यासाठो डाळ भिजवण्याचीही गरज नाही. इंस्टाग्रामवर sonali_mahajan27 या अकाऊंटवर ही रेसिपी शेअर केली गेली आहे. चला तर मग पाहूया झटपट आणि टेस्टी मेदुवडे कसे बनवायचे.

मेदुवडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य..

advertisement

- पाणी 1 ते 1/2 कप

- तेल 1 टीस्पून

- रवा 1 कप

- मीठ

- दही 1 टेबल स्पून

- कोथिंबीर

- कढीपत्ता

- तेल

झटपट मेदुवडे बनवण्याची पद्धत..

- गॅसवर एक कढई ठेवा. त्यामध्ये पाणी, तेल, रवा आणि मीठ टाकून एकत्र करा. रवा पाणी शोषून घेईल त्यानंतर गॅस बंद करून 5 मिनिटं झाकून ठेवा.

advertisement

- त्यानंतर या मिश्रणात दही, कोथिंबीर आणि कडीपत्याची पानं घाला. व्यवस्थित मळून याचा एक गोळा तयार करा.

- आता हाताला तेल लावून मिश्रणातून छोटे छोटे गोळे तयार करून ठेवा.

- या गोळ्यांना हातावर गोल गोल फिरवत मेदुवड्यासारखा आकार द्या.

- सर्व मेदुवडे तयार झाल्यानंतर गॅसवर एका कढईमधे तेल ठेवा.

- आता हे मेदुवडे तेलामध्ये तळून घ्या. अशाप्रकारे तुमचे झटपट टेस्टी मेदुवडे तयार आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गाडगे बाबाचं पुस्तक वाचलं, आयुष्य बदललं, अवलिया जिथे जातो तिथे स्वच्छता करतो!
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Quick Breakfast Recipe : डाळ न भिजवता 10 मिनिटांत बनवा क्रिस्पी मेंदू वडा! पाहा झटपट आणि सोपी रेसिपी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल