TRENDING:

Hyper Tension : उच्च रक्तदाबाला silent killer का म्हणतात ? high bp नियंत्रणासाठी काय करायचं ?

Last Updated:

जीवनशैलीतल्या चुकीच्या गोष्टींमुळे उच्च रक्तदाबाचं प्रमाण वाढतं, उच्च रक्तदाब असलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. शिवाय, जास्त मीठ खाणं, जंक फूड, ताण, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, तंबाखू आणि मद्यपान ही या silent killer ची प्रमुख कारणं आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : उच्च रक्तदाब म्हणजेच high bp असलेल्यांसाठी महत्त्वाची माहिती. नॅशलन हेल्थ मिशननं, रक्तदाबासंदर्भात अलर्ट जारी केला आहे. यात high bpला त्यांनी silent killer म्हटलं आहे.
News18
News18
advertisement

जीवनशैलीतल्या चुकीच्या गोष्टींमुळे उच्च रक्तदाबाचं प्रमाण वाढतं, उच्च रक्तदाब असलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. शिवाय, जास्त मीठ खाणं, जंक फूड, ताण, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, तंबाखू आणि मद्यपान ही या silent killer ची प्रमुख कारणं आहेत.

नॅशलन हेल्थ मिशननं, या अलर्टमधे, high bp कोणत्याही लक्षणांशिवाय हळूहळू शरीराचं कसं नुकसान करतो आणि प्राणघातक ठरू शकतो याविषयी माहिती दिली आहे. उच्च रक्तदाब हृदय, मूत्रपिंड आणि मेंदूला हानी पोहोचवतो. पण, संतुलित आहार, व्यायाम आणि नियमित तपासणीद्वारे रक्तदाब नियंत्रित करणं शक्य आहे.

advertisement

Ghee Benefits : घरगुती साजूक तुपाचा फेस पॅक आणि स्क्रबही, DIY स्किन केअर टिप्स

जीवनशैली - तज्ज्ञांच्या मते, उच्च रक्तदाबाचं सर्वात सामान्य आणि प्रमुख कारण म्हणजे आजची जीवनशैली. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या मते, उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी जीवनशैलीत छोटे बदल करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यावर लक्ष दिलं नाही तर ते हृदयरोग, स्ट्रोक, मूत्रपिंड निकामी होणं आणि डोळ्यांच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

advertisement

मीठ, ताण आणि लठ्ठपणा ही उच्च रक्तदाबाची मुख्य कारणं आहेत - जास्त मीठ खाण्यानं उच्च रक्तदाबाची समस्या जाणवते. दररोज जास्त मीठ खाल्ल्यानं रक्तदाब वाढू शकतो. प्रक्रिया केलेले पदार्थ, चिप्स, स्नॅक्स, लोणचं आणि टेकआउट जेवणात अनेकदा मीठ जास्त असतं.

याव्यतिरिक्त, सतत कामाचा ताण, कौटुंबिक समस्या किंवा दीर्घकाळापर्यंत मानसिक ताण यामुळे रक्तदाब वाढू शकतो. दिवसभर बसून राहणं, व्यायामाचा अभाव आणि लठ्ठपणा ही देखील अन्य कारणं आहेत.

advertisement

जंक फूड, तंबाखू आणि अल्कोहोलमुळे धोका वाढतो - याव्यतिरिक्त, जंक फूड आणि प्रक्रिया केलेलं अन्न म्हणजेच प्रोसेस्ड फूड, तंबाखू आणि अल्कोहोलचं जास्त सेवन यामुळे रक्तवाहिन्यांचं नुकसान होतं आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. विशेषतः पोटाभोवती जास्त वजन असेल तर हृदयावर दबाव वाढतो आणि रक्तदाब वाढतो.

Morning Habits : चांगल्या प्रकृतीसाठी चांगल्या सवयी, फिट तब्येतीसाठी हेल्थ टिप्स

advertisement

National Health Mission नं यासाठी काही उपाय सांगितले आहेत. उच्च रक्तदाब रोखण्यासाठी, नियमित रक्तदाब तपासणी, संतुलित आणि कमी मीठयुक्त आहार घेणं, दररोज किमान तीस मिनिटं व्यायाम करणं किंवा चालणं, ताण कमी करण्यासाठी योग-ध्यान करणं, तंबाखू आणि अल्कोहोलपासून दूर राहणं आणि वजन नियंत्रणात ठेवणं महत्वाचं आहे.

अठरा वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकानं वर्षातून किमान एकदा तरी रक्तदाब तपासला पाहिजे असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. कुटुंबातील एखाद्याला उच्च रक्तदाब असेल तर चाचणी करणं अधिक महत्त्वाचं आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
केळीचे दर घसरले, आल्याचे भाव तेजीत, डाळींबाची काय स्थिती?
सर्व पहा

वेळेत निदान झालं तर औषधं आणि जीवनशैलीतील बदलांनी ते सहजपणे नियंत्रित केलं जाऊ शकतं.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Hyper Tension : उच्च रक्तदाबाला silent killer का म्हणतात ? high bp नियंत्रणासाठी काय करायचं ?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल