Ghee Benefits : घरचं साजूक तूप देईल चेहऱ्याला ग्लो, काळी वर्तुळं होतील कमी, चेहऱ्यासाठी बनवा तूपाचा फेसपॅक
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
ऋतू बदलताना त्वचा खूप कोरडी होते. घरचं साजूक तूप मॉइश्चरायझर म्हणून काम करतं. चेहऱ्यावर तूप लावल्यानं सुरकुत्या येणं, उन्हामुळे होणारी जळजळ यासारख्या अनेक समस्या दूर होतात आणि त्यामुळे त्वचा तरुण दिसते. तूप खाल्ल्यानं त्वचेला आतून मॉइश्चरायझेशन मिळतं, त्वचा मऊ राहते.
मुंबई : खूप मेहनतीनं घराघरांत तयार होणारं तूप शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. तूप शरीरासाठी जितकं महत्त्वाचं आहे तितकंच त्वचेसाठीही. त्वचेची काळजी घेण्यासाठी फेसपॅक वापरत असाल तर आता तुपाचा फेसपॅक वापरुन पाहा.
घरगुती तूप त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. तुपामुळे त्वचा निरोगी राहते आणि ग्लो कायम राहतो. यातली जीवनसत्त्वं आणि हेल्दी फॅट्समुळे शरीराला ऊर्जा मिळते, शिवाय पचन, त्वचा आणि हाडं मजबूत करण्यासाठीही तूप उपयुक्त आहे.
त्वचेसाठी घरचं तूप कसं उपयुक्त आहे पाहूयात -
advertisement
ऋतू बदलताना त्वचा खूप कोरडी होते. घरचं साजूक तूप मॉइश्चरायझर म्हणून काम करतं. चेहऱ्यावर तूप लावल्यानं सुरकुत्या येणं, उन्हामुळे होणारी जळजळ यासारख्या अनेक समस्या दूर होतात आणि त्यामुळे त्वचा तरुण दिसते. तूप खाल्ल्यानं त्वचेला आतून मॉइश्चरायझेशन मिळतं, त्वचा मऊ राहते.
घरगुती तुपाचा फेस पॅक बनवायचा ते समजून घेऊया. घरगुती तुपाचा फेस पॅक घरी बनवता येतो. एका भांड्यात एक चमचा तूप, एक चमचा बेसन आणि चिमूटभर हळद एकत्र करा. चांगलं मिसळून घ्या. चेहऱ्याला लावा. हा तूप फेसपॅक पंधरा - वीस मिनिटं चेहऱ्यावर लावा आणि नंतर कोमट पाण्यानं धुवा.
advertisement
घरगुती साजूक तूप डोळ्यांखालील काळी वर्तुळं घालवण्यासाठीही उपयुक्त आहे. यासाठी, डोळ्यांभोवती तुपानं हलक्या हातानं मसाज करा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी असं मालिश करा.
मृत त्वचा काढून टाकण्यासाठी तुपापासून फेस स्क्रब देखील बनवू शकता. यासाठी, एक चमचा तूप आणि एक चमचा साखर मिसळून स्क्रब तयार करा. हा स्क्रब ओठांना लावल्यानं कोरडेपणा कमी होतो आणि ओठ चमकदार आणि मऊ होतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 13, 2026 2:16 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Ghee Benefits : घरचं साजूक तूप देईल चेहऱ्याला ग्लो, काळी वर्तुळं होतील कमी, चेहऱ्यासाठी बनवा तूपाचा फेसपॅक