चेहऱ्यावरच्या धुळीच्या थरामुळे किंवा काही कारणांमुळे मुरुम येऊ शकतात, या समस्येवर उपाय म्हणून फेस वॉश आणि क्रीम्सचा वापर करतात. पण मुरुम परत परत येत असतील तर त्यामागची कारणं शोधण्याची आणि समजून घेण्याची गरज आहे. त्वचेची योग्य काळजी घेऊनही मुरुम पुन्हा पुन्हा येत असतील, तर समस्या शरीराच्या आत असू शकते.
पोषक घटकांची कमतरता किंवा हार्मोनल असंतुलनामुळे देखील मुरुम येऊ शकतात. वारंवार येणाऱ्या मुरुमांच्या संभाव्य कारणांबद्दल जाणून घेऊया.
advertisement
Sweet Dish : झटपट पटापट होणारा गोड आणि कुरकुरीत पदार्थ, एकदा नक्की खाऊन बघा, गोड खाऊंसाठी मेजवानी
मुरुमं पुन्हा पुन्हा का येतात?
हार्मोनल असंतुलन - हार्मोनल म्हणजे संप्रेरकांचं असंतुलन हे मुरुम येण्याचं सर्वात सामान्य कारण आहे. शरीरातील अँड्रोजनची पातळी वाढल्यामुळे तेल ग्रंथी अधिक सक्रिय होतात, ज्यामुळे त्वचेची छिद्रं बंद होतात. यामुळे मुरुमांचा धोका वाढतो.
पीसीओएस (PCOS) - महिलांमधे, पीसीओएस किंवा मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे अनेकदा हनुवटी आणि जबड्यावर मुरुमं येतात.
आहार - जास्त प्रमाणात साखर आणि दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यानंही मुरुमं येऊ शकतात. या पदार्थांमुळे इन्सुलिनची पातळी अचानक वाढते, ज्यामुळे मुरुमं वाढू शकतात.
तणाव आणि मानसिक आरोग्य - आपण तणावात असतो, तेव्हा शरीर कॉर्टिसोल नावाचं हार्मोन स्रवतं. या हार्मोनमुळे त्वचा जास्त तेल तयार करते. तणावामुळे झोपही अपुरी राहते, ज्यामुळे त्वचेला स्वतःची दुरुस्ती करण्यासाठी वेळ मिळत नाही आणि मुरुमांची समस्या अधिकच वाढते.
मुरुमांपासून सुटका मिळवण्यासाठी त्वचेची काळजी तर घ्याच पण त्यानुसार तुमच्या जीवनशैलीत आणि आहारातही काही बदल करणं आवश्यक आहे.
Summer Care : थर्मोरेग्युलेशन म्हणजे काय ? उन्हाळ्यात थर्मोरेग्युलेशन का महत्त्वाचं ?
आहार - आहारात साखर, मैदा आणि तेलकट पदार्थांचं प्रमाण कमी करा. दुग्धजन्य पदार्थांमुळेही मुरुमं येतात असं वाटत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. आहारात अधिक ताजी फळं आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा.
शरीरातील पाण्याचं प्रमाण - शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी दररोज किमान तीन-चार लीटर पाणी प्या. त्वचेची आर्द्रता कायम ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे.
झोप - हार्मोन्सचं संतुलन राखण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी दररोज सात-आठ तास गाढ झोप घ्या.
स्वच्छता - दिवसातून दोनदा सौम्य क्लिन्झर वापरा आणि उशांचे अभ्रे नियमितपणे बदला.
डॉक्टरांचा सल्ला - मुरुमांचा त्रास तीव्र असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. ते पीसीओएस (PCOS) किंवा हार्मोनल असंतुलनाची तपासणी करू शकतात आणि मुरुमांसाठी औषधी क्रीम्स देखील लिहून देऊ शकतात.
