कच्छ : तोंडी लावायला लोणचं किंवा चटणी असेल तर डाळभातही आपण आवडीने खातो. लोणची, पापड, चटण्या बनवण्याची पद्धत घरोघरी वेगवेगळी असते. लसणाची चटणी आरोग्यासाठी उत्तम मानली जाते. आज आपण याच चटणीची परफेक्ट रेसिपी पाहणार आहोत.
रीना हर्ष यांनी ही रेसिपी सांगितली आहे. त्यानुसार, लसणाच्या 6 ते 7 पाकळ्या, 3 चमचे धणेपूड, 2 चमचे मसाला, चवीपुरतं मीठ आणि चवीपुरती साखर घ्यावी. तेलात सर्वात आधी लसणाच्या पाकळ्या घेऊन त्यात मीठ आणि साखर घालावी, त्यानंतर मसाला घालून फोडणी द्यावी. त्यामुळे चव चांगली येते.
advertisement
या चटणीला आणखी खास चव मिळते ते तुपामुळे. शिवाय आपल्याला गोड, आंबट, तिखट खायला फार आवडत असेल तर लिंबाचा रसही घालू शकता. फ्रिजरमध्ये ही चटणी बराच काळ टिकू शकते पण त्यात पाणी घालू नये. शिवाय साठवणीसाठी काचेचं भांड वापरावं.
लसणाच्या चटणीत तेल आटलं तरी ती खराब होत नाही. पित्त, सांधेदुखी इत्यादींवर ही चटणी फायदेशीर मानली जाते. शिवाय जेवणात लसणाची चटणी असेल तर 2 घास जरा जास्त जातात.
