TRENDING:

Chicken 65 डिशला 65 हा आकडा का दिला गेला? 99 टक्के लोकांना माहितीच नाही खरं कारण

Last Updated:

तुम्ही कधी विचार केला आहे का की, चिकनच्या या रेसिपीला 65 हे विशिष्ट नंबरचं नाव का देण्यात आलं असेल? यामध्ये काय 65 मसाले असतात की हे 65 तासांसाठी मॅरिनेट करायचं? नक्की हे नाव का पडलं?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : वीकेंड असो किंवा एखादी छोटी पार्टी, हॉटेलमध्ये गेल्यावर स्टार्टर म्हणून आपली पहिली पसंती असते ती म्हणजे कुरकुरीत आणि चटपटीत Chicken 65. लालभडक रंग, कढीपत्त्याचा खमंग तडका आणि जिभेवर रेंगाळणारी त्याची तिखट-आंबट चव... नुसत्या कल्पनेनेच तोंडाला पाणी सुटतं. आज हे डिश फक्त भारतातच नाही, तर सातासमुद्रापार लोकप्रिय झाली आहे.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, चिकनच्या या रेसिपीला 65 हे विशिष्ट नंबरचं नाव का देण्यात आलं असेल? यामध्ये काय 65 मसाले असतात की हे 65 तासांसाठी मॅरिनेट करायचं? नक्की हे नाव का पडलं? यामागे अनेक मजेशीर कथा आणि तर्क लावले जातात. चला तर मग, या लोकप्रिय डिशचा जन्म आणि नावामागचं गूढ उलगडूया.

advertisement

नाव 65 असण्यामागचं नेमकं कारण काय?

चिकन 65 च्या नावाबाबत अनेक थिअरीज सांगितल्या जातात, पण त्यातील सर्वात विश्वसनीय कथा चेन्नईशी जोडलेली आहे.

हॉटेल बुहारीचा इतिहास

असं मानलं जातं की, या डिशची सुरुवात चेन्नईमधील प्रसिद्ध हॉटेल बुहारी मधून झाली. 1965 मध्ये या हॉटेलने पहिल्यांदा ही डिश आपल्या मेनूमध्ये समाविष्ट केली होती. साल 1965 मध्ये शोधली गेल्यामुळे याला 'चिकन 65' असं नाव पडलं, असं बहुतांश लोक मानतात.

advertisement

मेनू कार्डमधील नंबर:

दुसरी एक थिअरी अशी सांगते की, त्याकाळी हॉटेलच्या मेनू कार्डमध्ये ही डिश 65 व्या क्रमांकावर होती, म्हणून ग्राहक ऑर्डर देताना 'चिकन 65' म्हणू लागले आणि तेच नाव पुढे रूढ झालं.

मसाल्यांचा तर्क:

काही लोक गमतीने असंही म्हणतात की यात 65 प्रकारचे मसाले किंवा 65 मिरच्या वापरल्या जातात, मात्र हा केवळ एक समज आहे, यात फारसं तथ्य नाही.

advertisement

आज या डिशची लोकप्रियता इतकी वाढली आहे की, चिकन न खाणाऱ्यांसाठी आता 'पनीर 65' किंवा 'गोबी 65' सारखे शाकाहारी पर्यायही तितक्याच आवडीने खाल्ले जातात.

काय आहे याची 'खास' रेसिपी?

चिकन 65 इतकं चविष्ट लागण्यामागे त्याची बनवण्याची एक विशिष्ट पद्धत आहे:

1. मॅरिनेशन: चिकनचे छोटे तुकडे करून ते दही, आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, जिरे आणि मिरी पावडरमध्ये मुरवले जातात.

advertisement

2. कुरकुरीतपणा: चिकनला बाहेरून कुरकुरीत करण्यासाठी त्यात कॉर्नफ्लोअर किंवा तांदळाचं पीठ मिक्स केलं जातं.

3. डीप फ्राय: त्यानंतर हे तुकडे कडक तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तळले जातात.

4. खास तडका: या डिशचा खरा 'हिरो' म्हणजे शेवटी दिला जाणारा तडका. तळलेल्या चिकनवर कढीपत्ता, हिरवी मिरची आणि थोडा लिंबाचा रस टाकून तडका दिला जातो, ज्यामुळे याला एक अनोखा सुगंध आणि चव प्राप्त होते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
युद्धाचा फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना, फक्त दीड रुपये किलोने खरेदी, कांद्याला काय मिळतोय भाव?
सर्व पहा

बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊशार असलेलं हे चिकन, मसाल्यांचा झणझणीतपणा आणि लिंबाचा आंबटपणा यामुळे कोणत्याही जेवणाची रंगत वाढवतं.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Chicken 65 डिशला 65 हा आकडा का दिला गेला? 99 टक्के लोकांना माहितीच नाही खरं कारण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल