काय साहित्य हवं?
चंपाकळी बनविण्यासाठी दोन वाटी मैदा, एक वाटी रवा,एक वाटी पिठीसाखर, दोन चमचे वेलची पूड, तळण्यासाठी तेल आणि पाक बनविण्यासाठी साधी साखर, डालडा किंवा तूप आणि पीठ भिजवण्यासाठी पाणी या साहित्याची आवश्यकता आहे.
या भाजीचं अन् जावयाचं आहे अनोखं नातं; ताटात वाढली नाही तर होतो अपमान
advertisement
कृती
चंपाकळी तयार करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला एका परातीमध्ये मैदा,रवा वेलची पूड आणि पिठीसाखर एकत्र करून घ्यावी. त्यामध्ये डालडा किंवा तूप गरम करून मोहन टाकावे. पूर्ण कोरड्या वस्तूंना मोहनाने एकत्रित करून घ्यावे. आता हे मिश्रण लागेल तेवढ्याच पाण्याने भिजवून घ्यायचे आहे त्याचा गोळा बनवत असताना नेहमीच्या कणकेपेक्षा थोडे घट्ट मळून घ्यायचे आहे.
10-15 मिनिटे झाकून ठेवायचंय त्यानंतर मध्यम आकाराचे गोळे बनवून घेऊन पाती लाटून घ्यायची आहे पाती लाटून झाल्यानंतर व्हिडीओत दाखवल्यावर मध्यभागातून चिरावे. न चिरा करून घ्यायचे आहे त्यानंतर रोल करावे. आता ही चंपाकळी कच्ची तयार झाली.
गणपती घरी आले, चुकूनही करू नका या गोष्टी, अन्यथा बाप्पा होईल नाराज
कच्ची चंपाकळी तेलातून सोनेरी रंग येईपर्यंत तळावी. त्यानंतर साखरेच्या पाकात बुडवून थोड्या वेळात काढून घ्यावी. ही गोड चंपाकळी खाण्यासाठी तयार आहे. आगामी सणाचा गोडवा या चंपाकळीनं तुम्ही नक्की वाढवू शकता.