या भाजीचं अन् जावयाचं आहे अनोखं नातं; ताटात वाढली नाही तर होतो अपमान
- Published by:News18 Marathi
Last Updated:
या पानांची शेती होत नाही. तर जंगलातून ही पानं आणली जातात.
दरभंगा, 19 सप्टेंबर : सणासुदीला घरी आलेल्या जावयाला वेगळाच मान असतो. त्याच्या खाण्या-पिण्यात कोणतीही कमतरता ठेवली जात नाही. त्यात बिहारमध्ये तिलकोर नावाच्या पानांची भाजी जावयाच्या पानात वाढण्याची परंपरा आहे. यामागील कहाणीदेखील रंजक आहे. या पानांची शेती नसते. तर जंगलातून ही पानं आणली जातात. बिहारमधील मिथिलांचलमध्ये याचं विशेष महत्त्व आहे. या भागात जावयाला विशेष पाहुण्याचा मान असतो.
जाणून घेऊया या रंजक भाजीविषयी...
मालती देवींनी दिलेल्या माहितीनुसार, मिथिलांचलमध्ये जावयाच्या ताटात कितीही व्यंजन वाढले असले, मात्र जर ताटात तिलकोरकाची भाजी नसेल तर अतिथीच्या सत्कारात कमी असल्याचं मानलं जातं. तिलकोरला खूप महत्त्व असतं. जितकी ही पानं दिसायला सुंदर असतात त्याहून अधिक खायला चवदार असतात. कुरकुरीत असल्याकारणाने या पानांची वेगळीच चव येते.
advertisement
अशी बनवतात भजी...
सर्वसाधारण दिसणारी ही पानं जंगलात किंवा झाडांमध्ये मिळतात. मालती देवींनी दिलेल्या माहितीनुसार, ही भजी बनवणं खूपच सोपं आहे. खासकरून जावयासाठी या पांनीची भजी बनवली जाते. सर्वात आधी तांदूळ वाटून त्याचं पीठ तयार केलं जातं. यानंतर हळदीसह काही मसाले एकत्र करून पेस्ट केली जाते. यानंतर ही विशेष पानं त्यात घोळवून तळली जातात. ही पानं खाल्ल्यामुळे आजारांपासून सुटका होत असल्याची मान्यता आहे.
advertisement
Location :
Bihar
First Published :
September 19, 2023 1:20 PM IST