TRENDING:

चमचमीत अन् चविष्ट! हॉटेलसारखं सांबार बनवा आता घरच्या घरी, जाणून घ्या सोपी रेसिपी...

Last Updated:

दाक्षिणात्य जेवणाचा आत्मा समजलं जाणारं सांबार हे केवळ चविष्टच नाही, तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. तूर डाळ व विविध भाज्यांनी तयार होणाऱ्या सांबारात प्रोटीन व पोषणद्रव्ये मुबलक असतात. अनेकांना...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे सांबार. याला दक्षिण भारतीय पदार्थांचा आत्माच मानलं जातं. गरम इडली, डोसा, वडा किंवा भातासोबत सांबार असलं की त्याची चव अजूनच वाढते. चवीला उत्तम असण्यासोबतच ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे, कारण यात अनेक भाज्या आणि डाळींचा वापर केला जातो.
sambar recipe
sambar recipe
advertisement

अनेकांना वाटतं की, सांबार बनवणं खूप अवघड काम आहे किंवा त्यासाठी खूप गोष्टी लागतात, पण जर तुम्हाला सांबारची योग्य रेसिपी माहीत असेल तर ते घरी खूप सोप्या पद्धतीने बनवता येतं. सांबारमध्ये वापरली जाणारी तूर डाळ प्रथिनांनी (प्रोटीन) भरपूर असते आणि भाज्या शरीराला आवश्यक पोषण देतात. तूर डाळ तर लोक आवडीने खातातच.

advertisement

सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हा पदार्थ हलका आणि पचायला सोपा आहे. चला तर मग, आता पारंपरिक दक्षिण भारतीय पद्धतीने सांबार कसं बनवायचं ते जाणून घेऊया...

सांबार बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • तूर डाळ – 1 कप
  • पाणी – 3 कप (डाळ शिजवण्यासाठी)
  • सांबार मसाला – 2 मोठे चमचे (तुम्ही विकतचा वापरू शकता)
  • advertisement

  • चिंचेचा कोळ – सुमारे 1 छोटा चमचा किंवा एका छोट्या लिंबाच्या रसाएवढा (एक छोटा लिंबाएवढी चिंच पाण्यात भिजवून त्याचा कोळ काढू शकता)
  • मोहरी – 1/2 छोटा चमचा
  • कढीपत्ता – 8-10 पाने
  • हिंग – चिमूटभर
  • सुकी लाल मिरची – 2
  • हळद – 1/2 छोटा चमचा
  • मीठ – चवीनुसार
  • तेल- 2 मोठे चमचे
  • advertisement

  • भाज्या (उदा. भेंडी, भोपळा, वांगी, गाजर, टोमॅटो, शेवग्याच्या शेंगा, दुधी, अळू यांसारख्या चिरलेल्या भाज्या) 1.5 कप

सांबार बनवण्याची सोपी कृती

  1. सगळ्यात आधी तूर डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये 3 कप पाणी, हळद आणि थोडं तेल घालून 3-4 शिट्ट्या होईपर्यंत चांगली शिजवून घ्या.
  2. यानंतर शिजवलेली डाळ चांगली घोटून (मॅश करून) बाजूला ठेवा.
  3. advertisement

  4. अर्ध्या कप कोमट पाण्यात चिंच भिजवून नंतर त्याचा कोळ काढून घ्या.
  5. एका कढईत थोडं तेल गरम करा. त्यात मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि सुकी मिरची घालून फोडणी द्या.
  6. आता त्यात चिरलेल्या भाज्या घालून मध्यम आचेवर 5 मिनिटे चांगल्या परतून घ्या.
  7. मग त्यात चिंचेचं पाणी घालून 5-7 मिनिटे शिजवा, जेणेकरून त्याचा कच्चेपणा निघून जाईल आणि चव चांगली येईल.
  8. आता त्यात घोटलेली डाळ आणि सांबार मसाला घाला. चवीनुसार मीठही घाला.
  9. संपूर्ण मिश्रण मंद आचेवर 10-12 मिनिटे शिजू द्या, जेणेकरून सगळ्या चवी एकमेकांत मिसळतील. यानंतर तुमचं स्वादिष्ट सांबार तयार होईल.

इतर काही टिप्स

  • तुम्ही वरून कोथिंबीर आणि एक चमचा तूप घालून चव अजून वाढवू शकता.
  • सांबार भात, डोसा, इडली किंवा वड्यासोबत वाढू शकता.
  • जर तुमच्याकडे घरगुती सांबार मसाला नसेल तर तुम्ही बाजारात मिळणारा मसाला देखील वापरू शकता.

या सोप्या सांबार रेसिपीने तुम्ही घरच्या घरीच सांबारचा आनंद घेऊ शकता, त्यासाठी तुम्हाला बाहेर जायची गरज पडणार नाही!

हे ही वाचा : डोसा म्हटलं की 'वाह'! आजच घरच्या घरी बनवा झक्कास म्हैसूर मसाला डोसा, जाणून घ्या रेसिपी

हे ही वाचा : ऐषोआरामी जीवनाचा केला त्याग, 26 वर्षांच्या 2 तरुणी झाल्या संन्यासी; आई-वडिलांना झाला आनंद!

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
चमचमीत अन् चविष्ट! हॉटेलसारखं सांबार बनवा आता घरच्या घरी, जाणून घ्या सोपी रेसिपी...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल