रब चॉकलेट बॉलसाठी साहित्य
रब चॉकलेट बॉल तयार करण्यासाठी तुम्ही केक बेस घ्या. तुम्ही बाजारात रेडिमेड केक बेसची प्रीमिक्स हे भेटते त्या पासून सुद्धा केक बेस तयार करू शकता. त्यासोबतच मैद्यापासून, रव्यापासून, बिस्किटांपासून देखील तुम्ही केकचा बेस हा तयार करून घेऊ शकता. तुमच्या चॉईस नुसार चॉकलेट सिरप, चोको चिप्स, डार्क कंपाउंड चॉकलेट, स्प्रिंकल्स हे साहित्य या रेसिपी साठी लागतं.
advertisement
विसराळूपणासाठी फायदेशीर आहे ‘हा’ पदार्थ; रोज खा होतील आश्चर्यकारक फायदे
कसा बनवायचा रब चॉकलेट बॉल?
सर्वप्रथम जो तुम्ही केकचा बेस तयार केलेला आहे तो बेस छान क्रश करून घ्यायचा आहे. किंवा तुम्ही त्याला मिक्सरमधून देखील काढू शकता. ते बारीक झाल्यानंतर त्यामध्ये क्रंच येण्यासाठी त्यामध्ये चोको चिप्स घालावे आणि नंतर चॉकलेट सिरप घालून त्याचे छान गोळे तयार करून घ्यायचे. हे गोळे तयार करून एका साईडला ठेवून द्यायचे. नंतर डार्क कंपाउंड चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं हे मेल्ट झालेल्या चॉकलेट मध्ये ते गोळे छान डीप करून घ्यायचे.
एका बटर पेपर वरती हे सर्व गोळे ठेवून त्यावरती गार्निशिंगसाठी तुम्ही चॉकलेटची शेव, स्प्रिंकल्स तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. नंतर ते सेट होण्यासाठी पाच ते दहा मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवावेत. फ्रिजरमध्ये ठेऊ नये. सेट झाल्यानंतर ते तुम्ही छान एका डिशमध्ये सर्व करून तुमच्या घरातील सदस्यांना व तुमच्या मित्र-मैत्रिणींना टेस्ट करायला देऊ शकता.