पुणे : रोजच्या जेवणात आणि नाश्त्यात वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. तरीही गावरान पदार्थांना अनेकांची पसंती असते. असाच एक पदार्थ म्हणजे हुरड्याचे थालीपीठ होय. अनेकांना आवडणारा हा पदार्थ बनवायचा कसा? असा प्रश्न सर्वांना असतो. गावरान हुरड्यापासून थालीपीठ बनवण्याची रेसिपी पुणे येथील गृहिणी स्वाती लोणकर यांनी सांगितली आहे.
प्रत्येक महाराष्ट्रीयन घरात थालीपीठ हा पदार्थ बनवला जातो. विविध कडधान्ये, डाळी एकत्र करून त्याच्या पिठापासून थालीपीठ तयार केले जाते. तसेच शेतात हुरडा आल्यानंतर ओल्या हुरड्याच्या पिठापासूनही थालीपीथ बनवलं जातं. हा गावरान पदार्थ शहरातही लोकप्रिय आहे. आपणही अगदी कमी साहित्यात घरीच हुरड्याचं थालीपीठ बनवू शकता.
advertisement
पुण्याच्या वडापावला दुबईतून मागणी, खवय्यांच्या लागतायेत रांगा, कुठं आहे हे ठिकाण?
साहित्य
ज्वारीच्या कोवळ्या हुरड्याचे पीठ, कांदा, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, मिरची, चवीनुसार मीठ हे साहित्य थालीपीठ बनवण्यासाठी लागेल.
चहासोबत खा मॅगी अन् व्हेज सँडविच; पुण्यात मिळतीय भन्नाट थाळी पाहा PHOTOS
थालीपीठ बनवण्याची कृती
सर्व प्रथम ज्वारीचा कोवळा हुरडा काढून तो भाजून घ्यावा. भाजलेल्या हुरड्याचे पीठ तयार करावे. या पिठामध्ये लसूण पेस्ट, हिरवी मिरची, कोथिंबीर, कांदा टाकायचा. पिठामध्ये हे साहित्य टाकून ते एकजीव मळून घ्यायचं. त्यानंतर सुती कापड घेऊन त्यावर थालीपीठ थापून घ्यायचं. हे थालपलेलं थालीपीठ मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचं.
थालीपीठची ही रेसिपी अत्यंत सोपी असून कधीही करता येते. थालीपीठ चवीला अत्यंत स्वादिष्ट लागतात. त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून पाहा.